भारतीय हॉकी संघाने एशियन हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. शुक्रवारी (११ ऑगस्ट) चेन्नईच्या मैदानावर भारत विरुद्ध जपान या संघांमध्ये सेमी फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ५-० ने विजय मिळवला आहे. भारतीय संघाकडून आकाशदीप सिंग, हरमनप्रीत सिंग, मनदीप सिंग, सुमित आणि सेल्वम कार्थीने गोल केले. आता भारतीय संघाचा अंतिम सामना मलेशिया संघासोबत रंगणार आहे. मलेशियाने सेमीफायनलच्या सामन्यात कोरियावर ६-२ ने विजय मिळवला होता.
भारतीय संघाला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून चौथ्यांदा या स्पर्धेचं जेतेपद मिळवण्याची संधी असणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी संयुक्तरीत्या ३ वेळेस जेतेपदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. भारत पाकिस्तान संघांसह कोरियाने २०२१ मध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता.
या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये जपानने दमदार खेळ केला. या क्वार्टरमध्ये भारतीय संघाला गोल करण्याची संधी मिळाली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जोरदार कमबॅक करत ३ गोल केले. भारतीय संघाकडून आकाशदीप सिंगने पहिला गोल केला. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवरून गोल केला. त्यानंतर मनदीप सिंगने गोल करत भारतीय संघाला ३-० ची मजबूत आघाडी मिळवून दिली. सुमितने तिसऱ्या क्वार्टरमध्ये तर सेल्वमने चौथ्या क्वार्टरमध्ये गोल करून भारतीय संघाला ५-० ने विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. (Latest sports updates)
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसह एकूण ६ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. यादरम्यान पाकिस्तान आणि चीनचा नॉकआऊट फेरीपूर्वीच बाहेर झाला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनलच्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तान संघावर ४-० ने विजय मिळवला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.