India vs Pakistan 2025: Players confused, Gautam Gambhir advises professionalism amid boycott calls 
Sports

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

India vs Pakistan cricket controversy : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सामन्यावरून वाद निर्माण झाला आहे. भारतीय संघातील खेळाडू संभ्रमात असताना कोच गौतम गंभीर यांनी मॅचकडे व्यावसायिक दृष्टीने पाहण्याचा सल्ला दिला आहे. जय शाह यांच्या दबावाचा आरोपही विरोधकांनी केला आहे.

Namdeo Kumbhar

  • पहलगाम हल्ल्यानंतर IND vs PAK सामना वादग्रस्त ठरला.

  • भारतीय खेळाडूंमध्ये सामना खेळावा की नाही, यावर संभ्रम.

  • ड्रेसिंग रूममध्ये या विषयावर गंभीर चर्चा झाली.

  • गौतम गंभीरने खेळाडूंना व्यावसायिक दृष्टीने खेळण्याचा सल्ला दिला.

  • संजय राऊत यांचा आरोप – जय शाह यांचा खेळाडूंवर दबाव.

India vs Pakistan Clash Sparks Controversy : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आज होणाऱ्या क्रिकेटच्या सामन्यावरून भारतात संतापाचे वातावरण आहे. याला राजकीय रंग आला आहे. पहलगाम हल्ल्यात भारताच्या २६ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही तुम्ही पाकिस्तानविरोधात सामना कसा खेळत आहात? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. आजच्या सामन्याबाबत भारतीय संघही संभ्रमात असल्याचे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पाकिस्तानविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकण्यावरून टीम इंडियात मतभेद असल्याचे समोर आलेय. कोच गौतम गंभीर याच्याकडून टीम इंडियाच्या खेळाडूची समजूत काढण्यात आल्याचं सांगितले जातेय. तुम्ही फक्त व्यवसायिक म्हणूनच याकडे पाहा, असा सल्ला गंभीर दिलाय. Gautam Gambhir’s advice to Indian team on IND vs PAK clash

जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघ पहिल्यांदाच आमनेसामने येत आहे. हा सामना रद्द करण्याची मागणी भारतात अनेकांनी केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमध्येही पाकिस्तानविरोधातील सामन्यावर बहिष्कार टाकण्याबाबत मतभेद आहेत. आजचा सामना खेळावा की नाही, याबाबत खेळाडूंमध्ये यावर संभ्रम आहे. ड्रेसिंग रूममध्ये यावर गंभीर चर्चा झाली. प्रशिक्षक गौतम गंभीर याने खेळाडूंना व्यावसायिक दृष्टिकोन ठेवण्याचा सल्ला दिलाय.

भारतीय संघातील खेळाडू पाकिस्तानविरोधात संभ्रमात आहेत. सामन्यावर बहिष्कार टाकावा का? यावर ड्रेसिंग रूममध्ये चर्चा झाली. गौतम गंभीर आणि इतर स्टाफसोबत भारतीय खेळाडूंनी चर्चा केली. गौतम गंभीर याने खेळाडूंना या सामन्याकडे फक्त व्यवसायिक म्हणून पाहण्याचा सल्ला दिला. मॅचकडे फक्त मॅच म्हणूनच पाहा, असे गंभीर याने खेळाडूंना सांगितल्याचे सांगितले जातेय. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियममध्ये आपल्याच देशातील लोक या सामन्यावेळी आपल्याला ट्र्रोल करतील, अशी भीती काही खेळाडूंच्या मनात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक वक्तव्य केलेय. टीम इंडियाला आजचा पाकिस्तान विरोधातील सामना खेळायचा नाही. पण त्यांच्यावर जय शाह यांचा दबाव आहे. काही खेळाडूंसोबत आमची चर्चा झाली आहे. पण त्यांची मजबूरी आहे. अनेक माजी खेळाडूंनी हा सामना खेळू नये, असा सल्ला दिला. पण जय शाह यांचा त्यांच्यावर दबाव आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सामना आज संध्याकाळी ८ वाजता होणार आहे. दोन्ही संघाने पहिला सामना जिंकला आहे. आजच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लगलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur Police : एमडी तस्कर पोलिसांच्या ताब्यात; १२ ग्रॅम ड्रग्ससह मुद्देमाल जप्त

Viral Video : भाजप नेता Live डिबेटमध्ये पायजामा न घालताच बसले, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT