team India  Saam tv
Sports

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक, रोमांचक सामन्यात ओमानला चारली धूळ

team India : आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयाची हॅट्रिक मारलीये. रोमांचक सामन्यात टीम इंडियाने ओमानला २१ धावांनी हरवलं.

Vishal Gangurde

टीम इंडियाचा आशिया कप २०२५ मध्ये सलग तिसऱ्या विजयासह सुपर ४ मध्ये प्रवेश

भारताने प्रथम फलंदाजी करत १८८ धावा केल्या

संजू सॅमसन आणि अभिषेक शर्माची झंझावाती खेळी

ओमानच्या आमिर कलीमने अप्रतिम फलंदाजी केली, पण संघाला विजय मिळवता आला नाही.

आशिया कप २०२५ च्या शेवटच्या लीग सामन्यात टीम इंडियाने मोठा विजय मिळवला आहे. अबु धाबीमध्ये खेळलेल्या सामन्यात भारताने ओमानला २१ धावांनी पराभवाची धूळ चारली. टीम इंडियाने सलग तिसऱ्यांदा सामना जिंकत विजयाची हॅट्रिक मारली.

भारताने प्रथम फलंदाजी करताना १८८ धावा कुटल्या. तर ओमाननेही चांगली फलंदाजी आव्हानापर्यंत पोहोचण्याचा उत्कृष्ट प्रयत्न केला. ओमानने २० षटकात ४ गडी गमावून १६७ धावा कुटल्या. ४३ वर्षीय खेळाडू आमिर कलीमने ओमानसाठी सर्वाधिक ६४ धावा कुटल्या. हमाद मिर्जाने ३३ चेंडूत ५१ धावा कुटल्या. जतिंदर सिंहने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या. भारताकडून हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंह, हर्षित राणा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ विकेट घेतला.

भारताची फलंदाजीची सुरुवात खराब झाली. शुभमन गिल अवघ्या ५ धावांवर बाद झाला. अभिषेक शर्माने १५ चेंडूत ३८ धावा केल्या. त्याने २ षटकार,५ चौकार लगावले. संजू सॅमसनने ४५ चेंडूत ५६ धावा कुटल्या. हार्दिक पंड्याने केवळ एकच धाव करू शकला. अक्षर पटेलने २६ तर तिलक वर्माने २९ धावा केल्या. टीम इंडियाने ओमानला १८९ धावांचं आव्हान दिलं होतं.

ओमानच्या विरोधात भारतीय गोलंदाज फार कमाल करु शकले नाहीत. हार्दिक पंड्याने ४ षटकात २६ धावा दिल्या. ओमानच्या फलंदाजांनी अर्शदीप सिंह, शिवम दुबे यांची जोरदार धुलाई केली. मागील दोन सामन्यात कुलदीप यादवची फिरकी चांगली चालली होती. मात्र, तिसऱ्या सामन्यात कुलदीप यादवची फिरकी फार कमाल दाखवू शकली नाही.

ओमानच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी ५६ धावा कुटल्या. आमिर कलीम आणि हमाद मिर्जाने संघाची धावसंख्या १४९ धावासंख्येपर्यंत नेला. टीम इंडियाला शेवटच्या काही षटकात ओमानच्या संघाला गुंडाळण्यात यश आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : एलिसा हीलीची खेळी ठरली निर्णायक; रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली

Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

Bardhaman Station : पश्चिम बंगालमध्ये रेल्वे स्टेशनवर मोठी दुर्घटना; अनेक प्रवासी जखमी, गर्दीचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळला ब्लू कॉर्नर नोटीस, पुणे पोलिसांनी टाकला मोठा डाव

Japan Declares Flu: ४ हजारांहून अधिक रुग्ण, जपानमध्ये शाळा बंद, रुग्णालये फुल्ल

SCROLL FOR NEXT