Asia Cup 2023 Points Table another good news for team india after beating pakistan  Saam TV
Sports

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियासाठी आली गुड न्यूज; बाबर आझमचं टेन्शन वाढलं

Asia Cup 2023 Points Table: या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आशिया कप २०२३ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. त्यांनी यापूर्वी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता.

Satish Daud

Asia Cup 2023 Points Table: आशिया कप २०२३ स्पर्धेतील सुपर-४ फेरीतल्या सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानवर तब्बल २२८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. या विजयामुळे टीम इंडियासह क्रिडाप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, मोठ्या विजयानंतर भारतीय संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. (Latest Marathi News)

या सामन्यापूर्वी पाकिस्तानचा संघ आशिया कप २०२३ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर होता. त्यांनी यापूर्वी बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवला होता. आता भारताविरुद्धच्या दारुण पराभवानंतर पाकिस्तानची थेट तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.

दुसरीकडे भारतीय संघ या सामन्यापूर्वी तिसऱ्या स्थानावर होता. टीम इंडियाच्या (Team India) खात्यात एकही गुण जमा झालेला नव्हता. पण पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर सर्व समीकरण ब़दलले आहे. कारण या विजयानंतर भारतालाही दोन गुण मिळाले आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या तिन्ही संघांचे समान दोन गुण आहेत.

पण, भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला आणि त्याचा फायदा नेट रनरेटमध्ये झाला आहे. या सामन्यानंतर भारताचा रन रेट हा ४.५६० एवढा झाला आहे. गुणतालिकेत हा सर्वात जास्त रन रेट आहे, त्यामुळे भारतीय संघाने या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे.

पाकिस्तानचेही दोन गुण असले तरी त्यांना मोठा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांचा रन रेट - १.८९२ असा झाला आहे. हा सर्वात कमी रन रेट आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. त्यामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

SCROLL FOR NEXT