asia cup 2023 trophy saam tv
Sports

Asia Cup 2023: धुमधडाक्यात होणार एशिया कपची सुरूवात, सोहळ्याला 'या' सेलिब्रिटींची मांदियाळी, जाणून घ्या कोण-कोण लावणार हजेरी

Asia Cup Opening Ceremony: वाचा कोण कोणते स्टार्स लावणार हजेरी.

Ankush Dhavre

Asia Cup 2023 Opening Ceremony Latest Updates:

आशिया चषक २०२३ स्पर्धेची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ३० ऑगस्टपासून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. पहिल्यांदाच ही स्पर्धा हायब्रिड मॉडेलमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे.

तरीदेखील स्पर्धेतील ४ सामने पाकिस्तानात आणि उर्वरित ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहे. २०१९ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे.

मुल्तानच्या मैदानावर पाकिस्तान विरुद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने स्पर्धेची सुरुवात होणार आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या रंगारंग कार्यक्रमात एआर रेहमान आणि आतिफ असलम यांच्या सुरांची मेहफिल रंगू शकते. भारतीय संघाचा पहिला सामना २ सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध रंगणार आहे. हा सामना श्रीलंकेत खेळवला जाणार आहे.

आशिया चषक स्पर्धेतील सामन्यांची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता होणार आहे. या स्पर्धेत एकूण ६ संघांनी सहभाग घेतला आहे. या ६ संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. ग्रुप एमध्ये भारत,पाकिस्तान आणि नेपाळचा संघ असणार आहे.

तर ग्रुप बीमध्ये श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा संघ असणार आहे. दोन्ही गटात टॉप २ मध्ये राहणारे संघ सुपर -४ मध्ये प्रवेश करतील. (Latest sports updates)

आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट

  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट

  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर

  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर

  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सुपर-4 सामने

  • अ 1 विरुद्ध ब 2 - 6 सप्टेंबर

  • ब 1 विरुद्ध ब 2 - 9 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध अ 2 - 10 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 1 - 12 सप्टेंबर

  • अ 1 विरुद्ध ब 1 - 14 सप्टेंबर

  • अ 2 विरुद्ध ब 2 - 15 सप्टेंबर

  • अंतिम - 17 सप्टेंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT