Asia Cup 2022 Pak Vs SL Babar Azam /Twitter SAAM TV
क्रीडा

Babar Azam Tweet : पाकिस्तानचा पराभव, पण बाबर आझमचं विराटसाठी पोस्ट केलेलं जुनं ट्विट होतंय व्हायरल

आशिया कप २०२२ फायनलमध्ये श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाला अन् बाबर आझम ट्रोल होऊ लागला.

Nandkumar Joshi

Babar Azam Tweet Viral | मुंबई: आशिया चषक स्पर्धेत फायनलमध्ये श्रीलंकेकडून पाकिस्तानचा पराभव झाला. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा पराभव झाल्यानंतर सध्या बाबर आझम ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. त्याचे जुने ट्विट आता व्हायरल होत आहे. ते ट्विट विराट कोहलीसाठी केले होते.

काही महिन्यांपूर्वी भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) खराब फॉर्मशी झुंजत होता. त्यामुळे विराटवर टीका होत होती. त्याचवेळी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम याने खास मेसेज विराटसाठी पोस्ट केला होता. ही वेळही निघून जाईल. कणखर राहा, असे त्याने ट्विटमध्ये म्हटलं होतं.

बाबर आझमचे (Babar Azam) हे जुने ट्विट पुन्हा व्हायरल झाले आहे. रविवारी, ११ सप्टेंबरला दुबईत आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात आला. या अंतिम लढतीत पाकिस्तानला श्रीलंकेकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी बाबर आझमचं ते जुनं ट्विट पुन्हा शेअर करत टीका करण्यास सुरुवात केली आहे. 'ये कभी नहीं गुजरेगा,' अशा शब्दांत बाबरवर टीका केली जात आहे.

बाबर आझमचं जुनं ट्विट पोस्ट करतानाच, यह कभी नहीं गुजरेगा, रोते रहो, असं एका युजरनं म्हटलं आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर आणखी एका युजरनं अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाकिस्तानला पराभूत करत श्रीलंकेनं सहाव्यांदा जिंकलं आशिया चषक

श्रीलंकेनं रविवारी दुबईत झालेल्या अंतिम लढतीत पाकिस्तानला पराभूत केलं. श्रीलंकेनं २३ धावांनी पाकिस्तानला हरवलं आणि आशिया चषकाच्या जेतेपदावर सहाव्यांदा नाव कोरलं. श्रीलंकेनं फलंदाजी करताना ५ विकेट अवघ्या ५८ धावांवर गमावल्या होत्या. त्यानंतर भानुका राजपक्षाने ४५ चेंडूंवर नाबाद ७१ धावांची तुफानी खेळी केली. त्या जोरावर श्रीलंकेनं १७० धावा केल्या. उत्तरादाखल पाकिस्तानी संघ १४७ धावांवर गारद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope: आज 'या' राशी होणार मालामाल; वाचा आजचे राशीभविष्य

दया दरवाजा तोड दो! CID चा मुहूर्त ठरला; चोर पोलिसांचा खेळ पुन्हा सुरू,कधी अन् कुठे पाहा

Maharashtra Election Results : राष्ट्रवादी- शिवसेना फूट भाजपच्याच पथ्यावर, काँग्रेससाठी धोक्याची घंटा

Horoscope Today: आज उजळणार 3 राशींचं नशीब; सुख-संपत्तीत होणार अपार वाढ

Maharashtra Election Results : न भूतो न भविष्य! महायुतीचा तब्बल २३५ जागांवर विजय, मविआ चारीमुंड्या चीत

SCROLL FOR NEXT