Asia Cup 2022 India vs Pakistan Rohit Sharma SAAM TV
Sports

Rohit Sharma | भारत-पाकिस्तान सामन्यावर हिटमॅन रोहित शर्माचं मोठं विधान, म्हणाला...

आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात हायव्होल्टेज सामना होणार आहे.

Nandkumar Joshi

Asia Cup 2022 | मुंबई: आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 'हायव्होल्टेज' लढत होणार आहे. या लढतीकडं अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं असतानाच, टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) यानं मोठं विधान केलं आहे.

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेला नाही. पण तो आशिया चषक स्पर्धेची तयारी करत आहे. स्पर्धेतील मुख्य फेरीतील सामने २७ ऑगस्टपासून युएईमध्ये होणार आहेत. भारत आणि पाकिस्तान (India Vs Pakistan) या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांमध्ये २८ ऑगस्ट रोजी दुबईत लढत होत आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना 'हायव्होल्टेज' असणार आहे.

गेल्या वर्षी यूएईमध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेनंतर दोन्ही संघ एकमेकांशी दोन हात करणार आहेत. गेल्या वर्षी पाकिस्तानने (Pakistan Cricket) टीम इंडियावर (Team India) १० विकेट राखून मोठा विजय नोंदवला होता. त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. त्यानंतर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी नाबाद अर्धशतके केली होती आणि संघाला विजय मिळवून दिला होता.

स्टार स्पोर्ट्सशी बोलताना, रोहित शर्मा यानं या हायप्रेशर सामन्याबाबत मोठे विधान केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढतीवर सगळ्यांचे लक्ष असते. या सामन्यात खूपच दबाव असतो यात दुमत नाही. मात्र, आम्ही संघात सर्वसाधारण वातावरण ठेवतो. या सामन्याचा कोणताही दबाव घेऊ इच्छित नाही. आमच्यासाठी हा फक्त क्रिकेटचा सामना आहे. ते केवळ आपले प्रतिस्पर्धी आहेत, हे आपल्या खेळाडूंना सांगणे माझ्यासाठी आणि राहुलभाईसाठी महत्वाचे आहे, असे रोहित म्हणाला.

टीम इंडियाने सात वेळा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेत डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून टीम इंडिया उतरणार आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन संघांमध्ये आशिया चषकात आतापर्यंत १४ वेळा आमनासामना झाला आहे. टीम इंडियाने आठ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानला केवळ पाच सामन्यांत विजय मिळवता आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा टी-२० फॉर्मेटमध्ये खेळवली जात आहे. पहिल्या मोसमाचे जेतेपद टीम इंडियाला मिळाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT