Asia Cup 2022 India vs Pakistan T 20 Hardik Pandya SAAM TV
Sports

Asia Cup 2022: धोनी स्टाइलनं मॅच फिनिश केल्यानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, माही भाईकडूनच शिकलोय!

पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर मॅच फिनिशर हार्दिक पंड्याचं सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Nandkumar Joshi

Hardik Pandya Against Pakistan | आशिया चषक स्पर्धा २०२२ मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात टीम इंडियाचा ऑलराउंडर हार्दिक पंड्याने जबरदस्त कामगिरी केली. टिच्चून गोलंदाजी आणि कडक फलंदाजी काय असते हे त्यानं दाखवून दिलं. या जोरावर भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात हार्दिक पंड्यानं मोहम्मद नवाझ याच्या चेंडूंवर षटकार खेचून विजय मिळवून दिला.

पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यानंतर टीम इंडियाचा (Team India) ऑलराउंडर हार्दिक पंड्यानं स्टार स्पोर्ट्सला सांगितलं की, मी एक फिनिशर म्हणून माही भाईकडून (MS Dhoni) खूप काही शिकलो आहे. तत्पूर्वी, हार्दिक पंड्याने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करताना मोहम्मद रिझवान, इफ्तिकार अहमद आणि खुशदिल शाह यांच्याही विकेट घेतल्या होत्या.

हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) चार षटकांत २५ धावा दिल्या. तर तीन महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. त्यानंतर सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आणि अवघ्या १७ चेंडूंत नाबाद ३३ धावांची तुफानी खेळी केली. या सामन्यात तो मॅन ऑफ द मॅच ठरला.

२० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रवींद्र जडेजा हा बाद झाला. त्याने २९ चेंडूंमध्ये ३५ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीसाठी मैदानावर आला. कार्तिक सामना जिंकून देईल, असं वाटलं होतं. पण त्याने पहिल्याच चेंडूवर एकेरी धाव घेऊन हार्दिक पंड्याला स्ट्राइक दिली. तिसऱ्याच चेंडूवर त्याने फटका लगावला. एक धाव होणार होती. पण धाव घेतली नाही. चौथ्या चेंडूवर त्याने षटकार लगावून सामना जिंकून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

Worli Fort : पावसाळ्यात फक्त १०० रुपयांत वरळी जवळच्या या किल्ल्याला द्या भेट

SCROLL FOR NEXT