नवी दिल्ली: टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) रविवारी पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी केली. पंड्याच्या जोरावर भारतीय संघाने आशिया चषक २०२२ मधील पहिला सामना ५ विकेटने जिंकला.
हा सामना UAE मधील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात हार्दिकने पहिल्या गोलंदाजीत २५ धावांत ३ बळी घेतले. यानंतर फलंदाजीत १७ चेंडूत नाबाद ३३ धावा करत विजय मिळवला. शेवटी पंड्याने विजयी षटकार मारून सामना जिंकला.
या मैदानावर पंड्याने विजयी षटकार ठोकून सामना जिंकून बनला, पण चार वर्षांपूर्वी याच मैदानावरुन पंड्याला स्ट्रेचरवर घेऊन जावे लागले होते. या मैदानावर १९ सप्टेंबर २०१८ रोजी आशिया चषकातील अंतर्गत पाकिस्तानविरुद्ध असाच सामना झाला होता. त्यानंतर आशिया चषक वनडे फॉरमॅटमध्ये झाला. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होती. त्यानंतर डावातील १८ वे षटक आणि त्याचे ५ वे षटक टाकणारा हार्दिक गंभीर जखमी झाला होता.
षटकातील पाचवा चेंडू टाकल्यानंतर हार्दिक जखमी झाला होता, तेव्हा तो जमिनीवर पडला. त्याला यावळी उभेही राहता येत नव्हते. त्यानंतर हार्दिकला स्ट्रेचरवरून मैदानावरुन बाहेर काढावे लागले होते. यावेळी पंड्या बेशुद्ध अवस्थेत होता. यानंतर सगळीकडे पंड्याची क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात येईल, असे बोलले जात होते. पण या दुखापतीतून पुनरागमन करत आता पंड्याने त्याच मैदानावर चमकदार कामगिरी केली आहे.
२०१८ च्या आशिया चषक स्पर्धेत खेळल्या गेलेल्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) पाकिस्तानला १६२ धावांवर गारद केले होते. यानंतर सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाचा भारताने २९ षटकांत ८ गडी राखून पराभव केला होता. या सामन्यात पंड्याने ४.५ षटकात २४ धावा दिल्या आणि एकही विकेट घेतली नव्हती.
हार्दिकने विजयी षटाकार मारत पाकिस्तानवर विजय मिळवला. पाकिस्तानचा फलंदाज मोहम्मद रिझवानने चांगली खेळी करत ४३ धावा केल्या. भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने ४, हार्दिक पंड्याने ३ आणि अर्शदीप सिंगने २ बळी घेतले.
१४८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी (Team India) हा सामना सोपा राहिला नव्हता, भारताची सुरुवातीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी केली नाही. उपकर्णधार केएल राहुल पहिल्याच चेंडूवर बाद झाला, तर कर्णधार रोहित शर्माने फक्त १० धावा केल्या. विराट कोहली ३५ धावा करून बाद झाला. फक्त ५३ धावांवर भारताच्या पहिल्या ३ विकेट गेल्या. पण रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्याने मोठी भागीदारी करत टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर आणले. जडेजाने ३५ आणि पंड्याने ३३ धावांची नाबाद खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.