asia cup 2022 Saam Tv
Sports

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध करणार अशी खेळी, पाकिस्तानविरुद्ध झाली होती मोठी चूक!

आज सुपर फोर सामन्यात भारताचा सामना श्रीलंके विरुद्ध होणार आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: आशिया चषकाच्या सुपर 4 मध्ये सामन्यात आज टीम इंडिया (Team India) विरुद्ध श्रीलंकेचा सामना होणार आहे. या सामनव्यात भारतीय संघाला सर्वोत्तम गोलंदाजांची गरज आहे. दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा, हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत भारताकडे गोलंदाजीमध्ये फारसे पर्याय नाहीत. भारत रविवारी पाकिस्तानविरुद्ध पाच गोलंदाजी पर्यायांसह खेळला.

पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सलामीच्या सामन्यात विजय मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हार्दिक पंड्या महागात पडला आणि युझवेंद्र चहलही या स्पर्धेत सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसत नाही. मागील सामन्यात दीपक हुडा खेळला, पण त्याला गोलंदाजी दिली नाही. (Asia Cup 2022)

गोलंदाजांमध्ये हार्दिकची चार षटके महत्त्वाची ठरतात. तर हार्दिक व्यतिरिक्त इलेव्हनमध्ये आणखी तीन वेगवान गोलंदाज असतील तर हार्दिकवरील दडपण कमी होईल आणि तो आपला जोरदार खेळ दाखवू शकेल. जडेजाच्या जागी संघाला समतोल राखण्यासाठी अक्षर पटेलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सामन्यापूर्वी आजारी असलेला आवेश खान तिसरा स्पेशालिस्ट वेगवान गोलंदाज म्हणून संघात पुनरागमन करू शकतो.

संघात 'ऋषभ पंत विरुद्ध दिनेश कार्तिक' वाद सुरूच आहे. कार्तिकला पहिल्या दोन सामन्यात संधी मिळाली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. पंतच्या जागी आधी कार्तिकचा समावेश करण्याचा आणि नंतर कार्तिकला संधी न देता वगळण्याचा निर्णय हा अजूनही चर्चेचा विषय ठरला आहे.

पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात संघ व्यवस्थापनाने दीपक हुडाचा समावेश केला. दीपकने फलंदाजीबरोबरच गोलंदाजी ऑफ ब्रेकही केली पण पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) कर्णधार रोहितने (Rohit Sharma) त्याला गोलंदाजी दिली नाही, यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. संघाचे गोलंदाज अपयशी ठरत होते, पण तरीही दीपकला षटक टाकण्याची संधी दिली नाही, त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरत आहे. (Asia Cup 2022)

संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, रवी बिश्नोई

श्रीलंका : पाथुम निसांका, कुसल मेंडिस, चारिथ असलंका, धनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), चमिका करुणारत्ने, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिष टेकशाना, असिथा फर्नांडो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Women: फक्त ४ धावांसाठी टीम इंडियाने सामना गमावला, उपांत्य फेरीची धकधक वाढली

शिंदे गटाचा दणका;KDMC मध्ये भाजप आणि काँग्रेससह ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

Heartbreaking: लेकाच्या मृत्यूची बातमी ऐकताच आईनेही सोडले प्राण; मन हेलावून टाकणारी कहाणी

Mumbai Fire: सिलेंडरचा स्फोट होऊन वरळीमधील झोपडपट्टीला आग,12 ते 15 झोपड्या जळून खाक

Pune Shaniwarwada: शनिवारवाड्यासमोर नमाज पठण, 'मजार हटवा,भगवा झेंडा फडकवू द्या'

SCROLL FOR NEXT