, Dinesh Kartik Saam Tv
क्रीडा

Rishabh Pant |श्रीलंकेविरुद्ध दिनेश कार्तिक की ऋषभ पंत? लेफ्टी बॅट्समन कोण असणार, टीम इंडिया अडचणीत

ऋषभ पंतला आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : ऋषभ पंतला आशिया चषक 2022 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या (Pakistan) सुपर फोर सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये यष्टीरक्षक, फलंदाज म्हणून खेळण्याची संधी मिळाली. त्याला दिनेश कार्तिकपेक्षा प्राधान्य देण्यात आले. कार्तिक आशिया चषक स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळला होता. मात्र, साखळी फेरीत पाकिस्तान आणि हाँगकाँगविरुद्ध फलंदाजीची संधी मिळाली नाही. पंतने 12 चेंडूंत 2 चौकारांच्या मदतीने 14 धावा केल्या. आता पुन्हा एकदा विकेटकीपर म्हणून टीम इंडियाचा पहिला पर्याय कोण यावरून चर्चेला उधाण आले आहे.

आयपीएलमुळे अनेक युवा खेळाडूंना फायदा झाला आहे. त्यात ऋषभ पंत, इशान किशन, संजू सॅमसनसारखे दिग्गज खेळाडू आहेत. याशिवाय टीम इंडियाचा सलामीवीर आणि उपकर्णधार केएल राहुलही यष्टिरक्षणाची जोरदार कांगीरी करतो. यावळी दिनेश कार्तिक हा सध्याच्या संघातील भारताचा सर्वात जुना टी-२० खेळाडू आहे. स्पेशालिस्ट यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंत टीम इंडियाची पहिली पसंती राहिला आहे. पण फिनिशर म्हणून दिनेश कार्तिकने आपली छाप सोडली आहे.

ऋषभ पंत कसोटी क्रिकेट आणि आयपीएलमध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये दिसतो. टीम इंडियासाठी टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना तो दडपणाखाली असल्याचे दिसते. पंतने टीमसाठी 56 टी-20 सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 897 धावा केल्या आहेत. त्याने तीन अर्धशतक ठोकले आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 126 आहे. यासोबतच या फलंदाजाने आयपीएलमध्ये 2 शतके झळकवली आहेत.

दिनेश कार्तिक

दिनेश कार्तिक 2006 पासून भारताकडून टी-20 खेळत आहे. वीरेंद्र सेहवागच्या नेतृत्वाखाली 2006 मध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 सामना खेळला होता. या सामन्यात दिनेश कार्तिकने 28 चेंडूत नाबाद 31 धावांची खेळी करत टीम इंडियाला सहा गडी राखून विजय मिळवून दिला. कार्तिकने टीम इंडियासाठी 49 टी-20 सामन्यांमध्ये 140 च्या स्ट्राइक रेटने 592 धावा केल्या आहेत आणि त्याची सरासरी 28 आहे.

टीम इंडियामध्ये (Team India) सध्या ऋषभ पंत हा एकमेव डावखुरा फलंदाज आहे. आणखी एक फलंदाज रवींद्र जडेजा तो दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर पडला आहे. कोणत्याही संघात डाव्या आणि उजव्या हाताच्या खेळाडूंचे संयोजन असणे आवश्यक असते. याचा फायदा पंतला मिळत आहे.

रवींद्र जडेजा पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळला तेव्हा पंतला बाहेर बसावे लागले होते. जडेजाने पंतची कमतरता भासू दिली नाही. भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेण्यासाठी त्याने पहिल्या सामन्यात महत्त्वाच्या वेळी 35 धावांची खेळी केली.

भारतीय संघ परिस्थिती, मैदानाची परिस्थिती आणि प्रतिस्पर्धी संघ यांच्यानुसार खेळतो आणि त्यानुसार सर्वोत्तम खेळणाऱ्याची निवड केली जाते. पाकिस्तानविरुद्ध फटकेबाजी करून पंत ज्या प्रकारे आऊट झाला, त्यामुळे त्याला ड्रेसिंग रूममध्येही कर्णधार रोहित शर्माचा राग सहन करावा लागला. श्रीलंकेविरुद्ध रोहित कोणाला संधी देणार हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : कोल्हापुरात औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार जखमी, घटना कॅमेऱ्यात कैद

Jharkhand Results 2024 : झारखंडमध्ये इंडिया आघाडीची सरशी; हेमंत सोरेन आणि कल्पना यांची जोडी ठरली सुपरहिट

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीसांनी चक्रव्यूह भेदलं! विधानसभा निवडणुकीत विरोधक चारही मुंड्या चीत

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

SCROLL FOR NEXT