AFG vs BAN, Asia Cup 2022  Twitter/@ACB
Sports

Asia Cup 2022 : बांग्लादेश-अफगाणिस्तान सामन्यात अनेक रेकॉर्डची नोंद; नजीबुल्लाने सर्वांनाच टाकलं मागे

नजीबुल्ला डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला

Satish Daud

AFG vs BAN, Asia Cup 2022 : आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेतील तिसरा सामना मंगळवारी बांगलादेश आणि अफगाणिस्तान या दोन संघांमध्ये झाला. दुबईच्या शारजाह मैदानावर हा सामना खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात अफगाणिस्तान संघाने ९ चेंडू बाकी असताना ७ गडी राखून बांग्लादेशवर मोठा विजय मिळवला. या सामन्यांत अनेक रेकॉर्डची नोंदही झाली. (Asia Cup 2022 Latest News)

कालचा सामना बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनसाठी खूप महत्त्वाचा होता. खरं तर, कालच्या सामन्यासह, तो बांगलादेशसाठी 100 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तिसरा खेळाडू बनला आहे. शकीबच्या आधी हा पराक्रम महमुदुल्लाह (120) आणि मुशफिकर रहीम (101) यांच्या नावावर होता.

अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राशिद खानने मंगळवारी बांगलादेशविरुद्ध सामन्यांत एकूण ३ बळी मिळवले. यासह तो टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. रशीदच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 115 विकेट्स आहेत. शाकिब अल हसन 122 विकेट्ससह अजूनही पहिल्या स्थानावर आहे.

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानलाही ३ विकेट्स मिळाल्या. यासह तो T20 क्रिकेटमध्ये 200 बळी घेणारा दुसरा युवा खेळाडू ठरला आहे. 21 वर्षे 155 दिवसांत त्याने हा विक्रम केला आहे. त्याचाच सहकारी खेळाडू राशिद खानचे नाव प्रथम क्रमांकावर येते. राशिदने वयाच्या 20 वर्षे 31 दिवसात टी-20 क्रिकेटमध्ये 200 विकेट घेतल्या. (Asia Cup 2022 AFG vs BAN News)

अफगाणिस्तानचा अनुभवी फलंदाज नजीबुल्ला झद्राननेही काल विशेष कामगिरी केली. खरं तर, डेथ ओव्हर्समध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. झद्रानने आपल्या टी-20 कारकिर्दीत आतापर्यंत डेथ ओव्हरमध्ये 53 षटकार मारले आहेत.

इतकेच नाही तर डेथ ओव्हर्समध्ये ५० हून अधिक षटकार मारणारा नजीबुल्ला हा पहिला फलंदाज आहे. अफगाणिस्तानच्या फलंदाजानंतर आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिलरने एकूण 47 षटकार मारले आहेत. या खेळाडूंनंतर तिसर्‍या क्रमांकावर मोहम्मद नबी (46) आणि चौथ्या स्थानावर इऑन मॉर्गन (41) यांचे नाव आहे.

बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात मुजीब उर रहमानला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार देण्यात आला आहे. त्याने ४ षटकांत १६ धावा देत बांग्लादेशच्या ३ खेळाडूंना माघारी पाठवलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

Pune Traffic : पुण्यातील वाहतूक कोंडी फुटणार, ३ राष्ट्रीय महामार्गांवरील उपाययोजना ठरतील रामबाण

Tiger Attack : गुरांना चारा घेण्यासाठी गेले असता वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, आठवड्याभरातील दुसरी घटना

Raksha Bandhan 2025: भावाला चांदीची राखी बांधल्याने काय फायदे होतात?

Sangali : यंदा नागपंचमीला शिरळकरांना जिवंत नागाचे दर्शन | VIDEO

SCROLL FOR NEXT