ashwani kumar  x (twitter)
Sports

Ashwani Kumar : साधारण क्रिकेटस्पर्धेत चमकला, MI च्या नजरेस पडला; KKR विरुद्ध पहिल्याच बॉलवर विकेट घेणारा अश्वनी कुमार कोण?

Ashwani Kumar News : वानखेडेमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना सुरु आहे. या सामन्यात अश्वनी कुमार या युवा वेगवान गोलंदाजाने पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यात त्याने ४ विकेट्स घेत विक्रम केला.

Yash Shirke

MI VS KKR Live Update : मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना वानखेडेमध्ये रंगला आहे. या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी कोलकाताच्या खेळाडूंवर वर्चस्व ठेवल्याचे पाहायला मिळत आहे. ट्रेंट बोल्ड, दीपक चहर, हार्दिक पंड्या यांच्यासह अश्वनी कुमार हा युवा वेगवान गोलंदाज चमकला आहे. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अश्वनी कुमारने ४ विकेट्स घेतल्या आहेत.

अश्वनी कुमारने तिसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवर कर्णधार अजिंक्य रहाणेला बाद केले. पुढे दहाव्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर रिंकू सिंह आणि सहाव्या बॉलवर मनीश पांडे यांची विकेट घेतली. त्यानंतर मुंबईसाठी धोकादायक ठरु शकणाऱ्या आंद्रे रसलला अश्वनी कुमारने बाराव्या ओव्हरमध्ये क्लीन बोल्ड केले. अशा प्रकारे अश्वनी कुमार पहिल्याच सामन्यात चमकला.

कोण आहे अश्वनी कुमार?

अश्वनी कुमार मूळचा मोहाली, पंजाबचा राहणारा आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. त्याने शेर-ए-पंजाब या टी-२० स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने २०२२ मध्ये सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये पंजाबकडून पदार्पण केले होते. या स्पर्धेत ८.५ च्या इकॉनॉमीने ३ विकेट घेतल्या होत्या. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये ३० लाख रुपयांची बोली लावून अश्वनीला संघात सामील केले होते.

मुंबई इंडियन्सची प्लेईंग ११ -

रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, अश्वनी कुमार, विग्नेश पुथुर.

कोलकाता नाईट रायडर्सची प्लेईंग ११ -

सुनील नारायण, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई -पुणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७-८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा|VIDEO

Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला करा हे 5 लक्ष्मी उपाय, कर्ज आणि आर्थिक अडचणी होतील दूर

Maharashtra Live News Update : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

Diwali 2025: दिवाळीत मातीचेच दिवे का लावतात? त्याचे फायदे काय?

Saree Dress Design: आईच्या जुन्या साड्यांपासून तयार करा 'हे' ट्रेंडी ड्रेस; कोणत्याही सणांसाठी आहे कम्फर्टेबल आणि बेस्ट

SCROLL FOR NEXT