अर्शदीप सिंग हा वर्तमान भारतीय संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. या गोलंदाजाने पदार्पण केल्यापासूनच टी-२० क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. आता इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या टी-२० मालिकेतही त्याच्या गोलंदाजीचा जलवा पाहायला मिळाला आहे.
इंग्लंडविरुद्ध पार पडलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात अर्शदीप सिंगने सुरुवातीच्या षटाकांमध्ये इंग्लंडच्या सलामी जोडीला तंबूत धाडलं. या शानदार गोलंदाजीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.
इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने नाणफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला अर्शदीप सिंगने सुरुवातीलाच २ मोठे धक्के दिले.
यासह अर्शदीप सिंग टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड युझवेंद्र चहलच्या नावावर होता. पण आता अर्शदीप सिंग अव्वल स्थानी जाऊन पोहोचला आहे. अर्शदीपने ९७ गडी बाद केले आहेत. तर चलहच्या नावे ९६ गडी बाद करण्याची नोंद आहे.
अर्शदीप सिंग -९७ गडी
युझवेंद्र चहल- ९६ गडी
भुवनेश्वर कुमार - ९० गडी
जसप्रीत कुमार - ८९ गडी
हार्दिक पंड्या- ८९ गडी
अर्शदीप सिंगने २०२२ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. पदार्पण केल्यापासून तो भारतीय संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज ठरतोय. भारतासह परदेशातही त्याने आपल्या वेगवान गोलंदाजीची छाप सोडली आहे. भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत विजेतेपद पटकावलं होतं. भारताला ही स्पर्धा जिंकून देण्यात अर्शदीप सिंगने मोलाची भूमिका बजावली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.