Arjun tendulkar visits kolhapur Narsinhwadi Datta Mandir to take blessings amd2000 saam tv news
Sports

Arjun Tendulkar: IPL नंतर अर्जुन तेंडुलकर देवदर्शनाला! कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांचं घेतलं दर्शन -Video

Arjun Tendulkar In Kolhapur: आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर देव दर्शनासाठी गेल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या चारही संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

तर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्सचा संघ या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मुंबईचा संघ प्लेऑफमधून बाहेर पडणारा पहिलाच संघ ठरला होता. दरम्यान ही स्पर्धा झाल्यानंतर मुंबईचा गोलंदाज अर्जुन तेंडुलकर देव दर्शनासाठी गेल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

आयपीएल झाल्यानंतर अर्जुन तेंडुलकर कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांच्या दर्शनाला पोहोचला आहे. तेंडुलकर कुटुंबियांची नृसिंहवाडीतील दत्त महाराजांवर श्रद्धा आहे. त्यामुळे ते दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला येत असतात. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर यांनी महारांजाचं दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली होती. मात्र यावेळी अर्जुन तेंडुलकर एकटा देव दर्शनाला पोहचल्याचे पाहायला मिळाले आहे.

अर्जुन तेंडुलकर आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही लोकसभेचं मतदान करण्यासाठी पाली हिलमध्ये एकत्र दिसून आले होते. यावेळी सचिनने नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. अर्जुन तेंडुलकरबाबत बोलायचं झालं, तर या हंगामातही तो मुंबई इंडियन्स संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसून आला होता.

या स्पर्धेतही त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली होती. मुंबईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर अर्जुनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश करण्यात आला होता. या सामन्यात त्याने २ षटक गोलंदाजी केली. मात्र तिसऱ्या षटकातील २ चेंडू झाल्यानंतर अर्जुनने दुखापतीमुळे मैदान सोडलं. त्यानंतर तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर परतला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT