Arjun Tendulkar saam tv
Sports

Arjun Tendulkar: 3 विकेट्स, 5 षटकार, 4 चौकार आणि 66 रन्स...! वानखेडेवर 'तेंडुलकर'चा डबल धमाका

T20 Mumbai League: वानखेडे स्टेडियमवर झालेल्या टी२० मुंबई लीग सामन्यात अर्जुन तेंडुलकरने ३ विकेट्स घेतल्यानंतर अवघ्या ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा करत एआरसीएस अंधेरीला बँड्रा ब्लास्टर्सवर नऊ विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला.

Surabhi Jayashree Jagdish

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी२० मुंबई लीग २०२६ च्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने त्याच्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने सुरुवातीला तुफान गोलंदाजीने समोरच्या टीममधील फलंदाजांच्या नाकीनऊ आणल्या. त्यानंतर झंझावात अर्धशतक झळकावून टीमला दणदणीत विजय मिळवून दिला.

अर्जुनने अचूक गोलंदाजीने विरोधी फलंदाजांना अडचणीत टाकलं आणि नंतर फलंदाजी करताना आक्रमक खेळी करत मैदानाच्या सर्व बाजूंनी चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार मिळाला. अर्जुनच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे एआरसीएस अंधेरीने सोमवारी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या एकतर्फी सामन्यात बँड्रा ब्लास्टर्सवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला.

टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या बँड्रा ब्लास्टर्सची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. एआरसीएस अंधेरीच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच उत्तम गोलंदाजी केली. ज्यामुळे बँड्रा ब्लास्टर्सच्या फलंदाजांना मोठा स्कोर करता आला नाही.

अर्जुन तेंडुलकरची कमाल

या काळात अर्जुन तेंडुलकरने त्याच्या भेदक गोलंदाजीने प्रभाव पाडला आणि तीन ओव्हर्समध्ये केवळ ११ रन्स देऊन ३ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतले. त्याच्या या गोलंदाजीत त्याने एक ओव्हर मेडन फेकली. प्रसून सिंगनेही १२ रन्समध्ये दोन विकेट्स घेत उत्कृष्ट साथ दिली. बँड्रा ब्लास्टर्सकडून केवळ ओम केशकमथ (४९ रन्स) आणि सागर छाब्रिया (४४ रन्स) चांगली खेळी करू शकले. या दोघांव्यतिरिक्त इतर कोणताही फलंदाज टिकू शकला नाही.

१४५ रन्सचं लक्ष्य गाठताना एआरसीएस अंधेरीची सुरुवात खराब झाली. ओपनर दिव्यांश सक्सेना केवळ २६ रन्स करून लवकर बाद झाला. त्यानंतर अर्जुन तेंडुलकर क्रीजवर आला आणि त्याने सामन्याचे चित्रच पालटलं. त्याने आक्रमक फलंदाजी केली आणि त्याच्या बँड्रा ब्लास्टर्सच्या गोलंदाजांना धुऊन काढलं. तेंडुलकरने अवघ्या ३४ चेंडूंमध्ये ६६ रन्सची नाबाद खेळी केली. या स्फोटक खेळीदरम्यान त्याने पाच षटकार आणि चार शानदार चौकार ठोकलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

१० पटीने केस वाढतील, कांदा-लवंगाची बनवा 'ही' खास पोटली

Maharashtra News Live Update : चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘समर्थ’ची भरारी, सर्व १४ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? ₹१५०० वर अपडेट आली, आज निर्णय होण्याची शक्यता

Highway vs expressway: हायवे आणि एक्सप्रेस-वे यांच्यातील फरक माहितीये का?

Fort Near Lonavala : भव्य प्रवेशद्वार, प्राचीन तोफा अन् तलाव; लोणावळ्याजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

SCROLL FOR NEXT