arjun tendulkar
arjun tendulkar  saam tv
क्रीडा | IPL

Arjun Tendulkar: अर्जुनचे पदार्पण होताच IPL स्पर्धेत घडला इतिहास! पहिल्यांदाच घडला हा योगायोग

Ankush Dhavre

MI VS KKR IPL 2023: सुपर संडेचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळताना दिसून येत नाहीये. त्याच्या ऐवजी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करताना दिसून येत आहे.

तर अर्जुन तेंडुलकरला देखील पदार्पण करण्याची संधी देण्यात आली आहे. दरम्यान अर्जुनने पदार्पण करताच एक विक्रम झाला आहे.

अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने २० लाखांची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तब्बल २ वर्षे वाट पाहिल्यानंतर अर्जुन तेंडुलकरला आपला पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान या सामन्यात अर्जुन तेंडुलकर पदार्पण करताच एक मोठा विक्रम घडला आहे. सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर ही बाप -लेकाची जोडी आयपीएल स्पर्धेत एकाच फ्रंचायझीसाठी पदार्पण करणारी पहिलीच जोडी ठरली आहे.

सचिन तेंडुलकरने २००८ मध्ये जेव्हा आयपीएल स्पर्धा सुरू झाली होती. त्यावेळी मुंबई इंडियन्स संघासाठी पदार्पण केले होते. तर अर्जुन तेंडुलकरला आज कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध पदार्पण करण्याची संधी मिळाली.

यापूर्वी योगायोग कधीच आला नव्हता. मात्र पदार्पणाच्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरला हवी तशी कामगिरी करता आली नाही. त्याने ३ षटक गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने १७ धावा खर्च केल्या. मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. (Latest sports updates)

या सामन्यात रोहित शर्माऐवजी सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करण्यासाठी मैदानात आला होता. दरम्यान मुंबई इंडियन्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून फलंदाजी करताना वेंकटेश अय्यरने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली. तर आंद्रे रसलने २१ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १८५ धावांचा डोंगर उभारला आहे. तर मुंबई इंडियन्स संघाला विजय मिळवण्यासाठी १८६ धावांची गरज आहे.

अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

मुंबई इंडियन्स:

इशान किशन (विकेटकीप), कॅमेरॉन ग्रीन, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार ), टिम डेव्हिड, नेहल वढेरा, अर्जुन तेंडुलकर, हृतिक शोकीन, पियुष चावला, दुआन जॅनसेन, रिले मेरेडिथ

कोलकाता नाईट रायडर्स:

रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, एन जगदीसन, नितीश राणा (कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tanvi Mundle : मराठी अभिनेत्रीचा बीचवर बिंधास्त फोटोशूट

Nana Patole On Opposition | एकेएक सगळेच विषय, नाना पटोलेंचा घणाघात!

Foods for Skin and Weightloss: रात्री 'या' फळांचे सेवन केल्यास त्वचेसोबत वजन राहिल नियंत्रणात

Pune Hit and Run Case | अल्पवयीने मुलाने दोघांना चिरडले! वडिलांवर होणार गुन्हा दाखल

Vidula Chougule : तुला पाहून सूर्यफूलही लाजून कोमेजलं...

SCROLL FOR NEXT