lionel messi twitter
क्रीडा

Lionel Messi: जगज्जेता मेस्सी! आठव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्काराचा ठरला मानकरी

Ballon D Or Award: मेस्सीने आठव्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे.

Ankush Dhavre

Lionel Messi Won Ballon D Or Award:

दिग्गज फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याने आठव्यांदा मानाचा बॅलन डी'ओर पुरस्कार पटकावला आहे. हा पुरस्कार पटकावणारा मेस्सी हा पहिलाच एसएलएस खेळाडू ठरला आहे. इंटर मियामीचे मालक आणि फुटबॉलचा दिग्गज खेळाडू डेव्हिड बेकहॅमने त्याला हा पुरस्कार दिला आहे.

लिओनेल मेस्सीने यापूर्वी २००९,२०१०, २०११, २०१२,२०१५, २०१९ आणि २०२१ मध्ये हा पुरस्कार पटकावला होता. बॅलन डी'ओर हा फुटबॉल खेळातील सर्वात मानाचा पुरस्कार आहे. संपूर्ण वर्षभरात दमदार खेळ करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाच वेळेस हा पुरस्कार पटकावला आहे. (Latest sports updates)

बॅलन डी'ओर पुरस्काराबद्दल काही खास गोष्टी..

बॅलन डी'ओर हा पुरस्कार सर्वोत्कृष्ट महिला आणि पुरुष फुटबॉलपटूला दिला जातो.

१९५६ नंतर दरवर्षी पुरुष फुटबॉलपटूंना या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे.

तर २०१८ पासुन महिलांनाही बॅलन डी'ओर पुरस्कार देण्याची प्रथा सुरु झाली आहे.

२०२० मध्ये कोरोना महामारी असल्याने या पुरस्काराची घोषणा केली गेली नव्हती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Ganesh: अभिनेते दिल्ली गणेश यांचे निधन, वयाच्या ८०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Jalgaon Crime : विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय; पतीचा घरात घुसून पत्नीवर प्राणघातक हल्ला

STD, ISD आणि PCO चा फुलफॉर्म काय? या तिघांमधील फरक तुम्हाला माहितीये का? जाणून घ्या एका एका क्लिकवर

Maharashtra Election : भाजपला सर्वाधिक ताकद कोण देणार? किंगमेकरसाठी शिंदे-दादांमध्ये स्पर्धा?

VIDEO: संभ्रम नाहीच, तुमच्या हिताचा निर्णय तुम्ही घ्या, पण.. ; जरांगेंनी स्पष्ट केली भूमिका

SCROLL FOR NEXT