Andres Balanta Dies/Social Media SAAM TV
क्रीडा

Andres Balanta News : अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटूचा २२ व्या वर्षी मृत्यू; सराव करताना मैदानातच कोसळला

फिफा वर्ल्डकप २०२२ सुरू असतानाच दुःखद घटना घडली आहे. अर्जेंटिनाच्या फर्स्ट डिव्हिजन क्लब एटलेटिको तुकुमानचा मिडफिल्डर आंद्रेस बलानता याचा मृत्यू झाला.

Nandkumar Joshi

Andres Balanta Dies : फिफा वर्ल्डकप २०२२ सुरू असतानाच दुःखद घटना घडली आहे. अर्जेंटिनाच्या फर्स्ट डिव्हिजन क्लब एटलेटिको तुकुमानचा मिडफिल्डर आंद्रेस बलानता याचा मृत्यू झाला. या फुटबॉलपटूनं अवघ्या २२ वर्षी जगाचा निरोप घेतला. आंद्रेस हा कोलंबिया संघासाठी इंडोनेशियामध्ये २० वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धाही खेळला होता.

कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा सुरू आहे. त्याचवेळी फुटबॉल चाहत्यांसाठी दुःखद बातमी आहे. कोलंबियाचा स्टार मिडफिल्डर आंद्रेस बलानता (Andres Balanta) याचा मृत्यू झाला. पुढच्याच महिन्यात म्हणजे १८ जानेवारी रोजी त्याचा २३ वा वाढदिवस होता. (Latest Marathi News)

आंद्रेस बलानता हा अर्जेंटिनातील फर्स्ट डिव्हिजन क्लब एटलेटिको तुकुमानसाठी खेळत होता. सराव करताना मंगळवारी आंद्रेसचा मृत्यू झाला. मैदानात सराव करताना आंद्रेस जमिनीवरच कोसळला. त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.

रुग्णालयात उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर लगेच उपचार सुरू केले होते. रुग्णालयात नेण्यापूर्वी क्लबच्या मेडिकल स्टाफनेही त्याच्यावर प्रथमोपचार करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगितले जात आहे. (Sports News)

कोलंबिया संघासाठी अंडर २० वर्ल्डकप २०१९ मध्ये खेळला होता आंद्रेस

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एटलेटिको तुकुमान क्लबने अलीकडेच हॉलिडे साजरा केला होता. ब्रेकनंतर संघाचा सराव सत्र होता. या दुःखद घटनेनंतर क्लबचे अधिकारी अग्नासियो गोलोबिस्की यांनी सांगितले की, आंद्रेस बलानता याच्या निधनाबद्दल सांगताना दुःख होत आहे. क्लबच्या सर्व समर्थकांना प्रचंड दुःख झालं आहे. त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

आंद्रेस बलानता याने जुलै २०२१ मध्ये क्लब जॉइन केला होता. त्याआधी तो कोलंबियाच्या क्लब डेपोर्टिवो कालीमध्ये खेळत होता. त्यानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच कोलंबियन क्लबसोबत केली होती. त्यानं कोलंबिया संघाचे २०१९ मध्ये इंडोनेशियात झालेल्या अंडर २० वर्ल्डकपमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: हिवाळ्यात काकडी खाणे चांगले की वाईट

Shocking Video: बापरे बाप... चक्क काकूंनी सापांना कपड्यांसारखे धु धु धुतले; व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल...

Vastu Tips: वास्तुनुसार 'या' मूर्ती घरात ठेवा, सुख शांती मिळेल

Maharashtra News Live Updates: योगींच्या 'बटेंगे तो कटेंगे' घोषणेला देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

SCROLL FOR NEXT