Virat Kohali And Anushka Sharma  Google
Sports

Virat Kohli : विराट कोहली होणार पुन्हा बाबा; अनुष्का देणार गोड बातमी; AB डिव्हिलियर्सनं सांगितली खुशखबर

Virat Kohli : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हालणार आहे. याचा खुलासा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर केलाय.

Bharat Jadhav

Ab De villiers Revealed On Virat Kohli Secrete in Youtube:

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यांच्या घरी पुन्हा एकदा पाळणा हालणार आहे. याचा खुलासा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलियर्सने सोशल मीडियावर केलाय. डिव्हिलियर्सने गुपीत बातमी सर्वांसमोर आणल्यानंतर विराटचे चाहते या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.(Latest News)

गेल्या काही दिवसापूर्वी विराटने भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातून बाहेर गेला होता. या सामन्यातून बाहेर जाण्याचे कारण कौटुंबिक असल्याचे सांगण्यात येत होते. विराट सध्या पत्नीसोबत देशाबाहेर आहे. विरुष्काच्या घरात पुन्हा एकदा पाळणा हालणार असल्याचं विराटचा जवळचा मित्र डिव्हिलियर्सने म्हटले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डिव्हिलियर्सने त्याच्या यूट्यूब चॅनलवर एका चाहत्याशी बोलताना हे गुपित उघड केले आहे. "विराट कोहलीसाठी हा कौटुंबिक काळ आहे. त्याच्या घरी आणखीन एक लहान पाहुणा येणार आहे", असं डिव्हिलियर्सने म्हटलं आहे. डिव्हिजियर्स यूट्यूबवर चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत असताना एका चाहत्याने त्याला विराटबद्दल विचारले. मेसेजवर एबीने विराटसोबत केलेल्या चर्चेचा उल्लेख डिविलियर्सने हे गुपीत समोर आणले आहे.

दरम्यान विराट कोहली एबीशी काय म्हणाला हे डिविलियर्सने आपल्या चाहत्याने सांगितले. एबी म्हणाला की मी त्याला विचारलं की, मला तुला काही काळ भेटायचं आहे. तू कसा आहेस?" यावर उत्तर देताना विराट म्हणाला, "सध्या मला माझ्या कुटुंबासोबत राहण्याची गरज आहे. मी चांगला आहे."

असं सांगताना एबीने विराट कोहलीचं गुपीत उघडे केले. डिव्हिलियर्स म्हणाला, "हो, त्याच्या घरी अजून एक लहान पाहुणा येणार आहे. हा कौटुंबिक काळ आहे आणि त्याच्यासाठी गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मला वाटतं की, बहुतेक लोकांचे प्राधान्य कुटुंब असते. यासाठी तुम्ही विराटवर भाष्य करू शकत नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT