Asian Games 2023:  Saam tv
Sports

Asian Games 2023: ऊसाच्या भाल्याच्या सरावाने अन्नू राणीला मिळवून दिलं सुवर्ण; आशियाई क्रीडा स्पर्धेत उंचावली देशाची मान

Asian Games 2023: भारताची भालाफेक खेळाडू अन्नू राणीने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कमाल केली आहे.

Vishal Gangurde

Asian Games 2023:

भारताची भालाफेक खेळाडू अन्नू राणीने चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कमाल केली आहे. भालाफेकमध्ये अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकलं आहे. अन्नूने सुवर्ण जिंकून इतिहास रचला आहे. (Latest Marathi News)

अन्नू राणीने मंगळवारी भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलं आहे. अन्नूने तिच्या चौथ्या यशस्वी प्रयत्नात ६२.९२ मीटर लांब भाला फेकला. त्याचबरोबर श्रीलंकेच्या नदीशा दिलहानने रौप्यपदक जिंकलं.

आशियाई क्रीडा स्पर्धेत आज २ सुवर्णपदक जिंकले आहेत. पारुलने ५ हजार मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं आहे. तर भालाफेकमध्ये अन्नू राणीने सुवर्णपदक जिंकलं आहे.

अन्नू राणीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील १५ वे सुवर्णपदक जिंकलं आहे. सुवर्णपदक जिंकल्यानंतर अन्नू भारताचा झेंडा अभिमानाने फडकवताना दिसली.

अन्नू राणीचा शेतकरी कुटुंबात जन्म

अन्नू राणी ही मेरठ येथील रहिवासी आहे . अन्नू राणीने नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत ६२.३४ मीटर भाला फेकून नाव उंचावलं होतं. अन्नूला लहाणपणापासून भालाफेकमध्ये नाव कमावण्याची इच्छा होती.

अन्नूकडे भाला विकत घेण्याचेही पैसे नव्हते. त्यामुळे अन्नूने ऊसाच्या भाल्यापासून सराव केला. जिल्हा पातळीवर खेळता-खेळता अन्नू आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली.

पारुलने जिंकलं १४ वे सुवर्णपदक

भारताच्या पारुल चौधरीनं ५ हजार शर्यतीत सुवर्ण पदक मिळवलंय. पारुलने काल ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक जिंकले होतं. त्यानंतर तिने पुन्हा सुवर्ण इतिहास लिहिला आहे. पारुलनं शेवटच्या ३० मीटरमध्ये पुनरागमन करताना १५ मिनिटे १४.७६ सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

आई अन् मुलानं १३ व्या मजल्यावरून उडी मारली; पती झोपलेला असताना आयुष्य संपवलं, सुसाईड नोटमधून माहिती उघड

GK: शिंकताना डोळे आपोआप का मिटले जातात? जाणून घ्या कारण

Shocking : तलाठ्याचा धक्कादायक प्रताप, पेन्शनच्या फाईलवर सही करण्यासाठी चक्क बियर बारच्या बिलाची मागणी

नगमासोबतच शुभी जोशीला डेट? 'Bigg Boss 19'च्या स्पर्धकावर 'प्रेमात धोका' दिल्याचा आरोप, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT