कोलकाता नाइट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या दोन संघांमध्ये शुक्रवारी सामना पार पडला. हा सामना बंगळूरुमधील चिन्नास्वामी स्टेडियमध्ये पार पडला. या सामन्यामध्ये ७ गडी राखून कोलकाता संघाने बंगळूरुचा पराभव केला. याच सामन्या दरम्यान आंद्रे रसलने इतिहास रचला आहे. त्यानं आपीएलमध्ये २००० पेक्षा जास्त धावा आणि १०० पेक्षा जास्त बळी घेणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. रसेलने २०१२ मध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघातून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. (Latest News)
त्यानंतर रसेलने २०१४ मध्ये कोलकाता नाईट राईडर्समध्ये पदार्पण केलं. त्याने ११४ सामन्यांमध्ये २३२६ धावा केल्या आहेत आणि त्याच्या नावावर १०० हून अधिक बळी आहेत. रसल आयपीएल स्पर्धेत दोनवेळा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअरचा पुरसकार पटकवणारा दुसरा खेळाडू आहे. बंगळूरु विरुद्धच्या सामन्यात त्याने २९ धावांमध्ये दोन बळी घेतले. त्याशिवाय त्याने १०० बळींचा आकडा पूर्ण केला आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
त्यामुळे सर्वाधिक बळी घेतल्ल्या खेळाडूंच्या यादीत त्यानं त्याचे नाव कोरले आहे. रसेलने बंगळूरु विरुद्धच्या सामन्यात कॅमरन ग्रीन आणि रजत पाटीदार या दोन्ही फलंदाजांना बाद केले. ग्रीनने कोहलीच्या साथीने डावाला चांगली सुरुवात केली होती. त्यावेळी रसेलने ग्रीनला बाद करुन महत्त्वाची भागीदारी तोडली. रसेल आयपीएलमध्ये कोलकाता संघासाठी १०० बळी घेणारा सुनील नारायन नंतरचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.
कोलकाता नाइट राईडर्सने २०२४ च्या आयपीएल स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. आपल्या पहिल्या सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबादचा ४ धावांनी पराभव केला होता. या सामन्यात आंद्रे रसेलने दमदार फलंदाजी केली होती. त्याने २५ चेंडूत ६४ धावांची खेळी खेळली होती. या खेळीत रसेलने ७ षटकार मारुन संघाला सामना जिंकण्यास मदत केली. त्याच्या दमदार फलंदाजीमुळे चाहत्यांच्या आणि संघाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.