alex carey catch saam tv
Sports

Alex Carey catch : भावा १ नंबर! असा कॅच कधीतरीच बघायला मिळतो; VIDEO बघून तुम्हीही म्हणाल, वाह कमाल!

Alex Carey catch in England vs Australia Match : चॅम्पियन्स ट्रॉफीत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या अॅलेक्स कॅरीनं पकडलेला कॅच केवळ अवर्णनीय असाच आहे. हा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Nandkumar Joshi

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झालीय. या स्पर्धेची रंगत वाढत चालली आहे. त्याला आता इंग्लंड-ऑस्ट्रेलिया सामन्यानं चारचाँद लावले आहेत. कारण ठरलाय तो ऑस्ट्रेलियाचा अॅलेक्स कॅरी. एरवी हातात ग्लोव्ह्ज घालून स्टंपच्या मागे कॅच घेणारा कॅरी मिडऑनला फिल्डिंगला उभा होता. त्याचवेळी सॉल्टनं जोरदार फटका मारला. सॉल्टनं टोलावलेला बॉल घोंघावत जात होता. पण कॅरीनं हवेत झेपावून कॅच घेतला. हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

चॅम्पियन्स ट्रॉफीतील चौथा सामना इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन बलाढ्य संघांत होत आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये हा सामना होतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ गोलंदाजी करत आहे. या सामन्यात अॅलेक्स कॅरी हा विकेटकीपिंग करत नाही. जोस हा विकेटकीपिंग आहे. कॅरीला मिडऑनवर फिल्डिंगला उभं करण्यात आलं होतं. स्टम्पमागे जबरदस्त कामगिरी करणारा कॅरी मैदानाच्या चौफेर सॉलिड फिल्डिंग करू शकतो याची झलक या सामन्यात बघायला मिळाली.

जबरदस्त कॅच

अॅलेक्स कॅरीला स्टम्पमागे कमाल-धमाल करताना आपण सर्वांनी बघितलंय. पण इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात त्यानं फिल्डिंगमध्ये जलवा दाखवलाय. दुसरी ओव्हर सुरू असताना, कॅरी हा मिड ऑनला उभा होता. सॉल्टनं मिड विकेट आणि मिड ऑनच्या मध्येच चेंडू जोरानं टोलवला. हा फटका इतका वेगात होता की तो सीमापार जाईल असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण कॅरीनं धावून हवेत झेपावत उडालेला झेल टिपला. हा झेल बघून सगळेच अवाक् झाले.

वर्ल्डकपमध्ये संधी मिळाली नाही

अॅलेक्स कॅरी हा कसोटीत ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज आणि विकेटकीपर आहे. पण वनडे टीममध्ये त्याला जास्त संधी दिली जात नाही. २०२१ नंतर त्याला टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली नाही. वनडेमध्येही २०२३ च्या वर्ल्डकपमधील एका सामन्यानंतर वगळलं होतं. त्यानंतर अवघ्या ५ सामन्यांत खेळण्याची संधी त्याला मिळाली. कॅरीने ७७ वनडे सामन्यांत २०१९ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक आणि १० अर्धशतके आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

SCROLL FOR NEXT