players to watch out  saam tv
Sports

GT vs MI Eliminator: राशिद ते मधवाल, ‘या’ ५ खेळाडूंवर असणार सर्वांच्या नजरा,गाजवू शकतात क्वालिफायरचा सामना

GT vs MI Players To Watch Out: गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात कोणते ५ खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात, यावर एक नजर टाकूया.

Ankush Dhavre

GT vs MI, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज क्वालिफायर २ चा सामना पार पडणार आहे. या सामन्यात ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्स आणि गतविजेता गुजरात टायटन्स संघ आमने सामने येणार आहेत.

हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. अंतिम सामन्यात विजयी संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे.

दरम्यान गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात कोणते ५ खेळाडू चांगली कामगिरी करू शकतात, यावर एक नजर टाकूया.

१) आकाश मधवाल:

मुंबई इंडियन्स संघाला लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय मिळवून देण्यात आकाश मधवालने मोलाची भूमिका बजावली होती. गुजरात टायटन्स संघाविरुद्ध होणारेय सामन्यात देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

लखनऊ विरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ३.३ षटक गोलंदाजी करत केवळ ५ धावा खर्च केल्या आणि ५ गडी बाद केले होते.

२) शुभमन गिल :

गुजरात टायटन्स संघाचा फलंदाज शुभमन गिलने आतापर्यंत २ शतके झळकावली आहेत. आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाला जर विजय मिळवायचा असेल तर या सामन्यात गिलची बॅट चालणं गरजेचं आहे. (Latest sports updates)

३) सूर्यकुमार यादव:

मुंबई इंडियन्स संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव देखील या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याने १४ डावात ५०० धावांचा पल्ला गाठला आहे. यादरम्यान त्याने एक शतक देखील झळकावले आहे. जर तो आज चालला तर नक्कीच मुंबईचा संघ या सामन्यात धावांचा डोंगर उभारू शकतो.

४) मोहम्मद शमी :

गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या हंगामात जोरदार फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेत सर्वाधिक २६ गडी बाद करत त्याने ऑरेंज कॅपवर कब्जा केला आहे. त्यामुळे क्वालिफायर २ मध्ये तो गुजरात टायटन्स संघासाठी अतिशय महत्वाचा गोलंदाज ठरू शकतो.

५) राशिद खान :

गुजरात टायटन्स संघाचा फिरकी गोलंदाज राशिद खानने अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवलं आहे. या स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा तो मोहम्मद शमीनंतर दुसरा गोलंदाज आहे. आज होणाऱ्या सामन्यात देखील त्याच्याकडुन चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT