Akash Deep x
Sports

Ind Vs Eng सामन्यानंतर आकाश दीपला अश्रू अनावर, कॅन्सरग्रस्त बहिणीला समर्पित केला विजय

India Vs England : भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये आकाश दीपने दोन्ही डावात मिळून १० विकेट्स घेतल्या आहेत. ही कामगिरी आकाश दीपने त्याच्या कर्करोगग्रस्त बहिणीला समर्पित केली आहे.

Yash Shirke

Akash Deep : भारताने एजबॅस्टन कसोटी सामन्यामध्ये इंग्लंडवर ३३६ धावांनी विक्रमी विजय मिळवला. या विजयात भारताचा वेगवान गोलंदाज आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली. सामन्याच्या पहिल्या डावात ४ आणि दुसऱ्या डावात ६ असे एकूण १० गडी आकाश दीपने बाद केले. या कामगिरीमुळे आकाश दीपचे सर्वत्र कौतुक होत आहे.

एजबॅस्टनमधील ऐतिहासिक विजयानंतर आकाश दीप भावूक झाला. आकाश दीपने हा विजय त्याच्या बहिणीली समर्पित केला. त्याची बहीण मागील दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंज देत आहे. 'मी जेव्हा-जेव्हा गोलंदाजीसाठी यायचो, तेव्हा माझ्या मनात माझ्या बहिणीचा विचार यायचा, सध्या माझ्या बहिणीची प्रकृती स्थिर आहे', असे आकाश दीप म्हणाला.

इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटी सामन्यात भारतीय संघाने ३३६ धावांनी विक्रमी विजय मिळवला. भारताच्या विजयात वेगवान गोलंदाज आकाश दीपने महत्त्वाची भूमिका बजावली. आकाशने इंग्लंडच्या पहिल्या डावात चार बळी घेतले. तर दुसऱ्या डावात त्याने सहा बळी घेतले. म्हणजेच आकाश दीपने सामन्यात १० बळी घेतले, जे त्याच्यासाठी एक विशेष कामगिरी होती.

'मी कुणाला सांगितले नव्हते. माझी मोठी बहीण मागील दोन महिन्यांपासून कर्करोगाशी झुंजत आहे. आता तिची प्रकृती स्थिर आहे. माझी कामगिरी पाहून तिला सर्वात जास्त आनंद झाला असेल, असे मला वाटते. मी जेव्हा चेंडू हातात घेतला होता, तेव्हा तिचा चेहरा माझ्यासमोर येत होता. हा सामना मी तिला समर्पित करु इच्छितो. मला तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा आहे', असे आकाश दीपने म्हटले.

आकाश दीप हा इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात १० बळी घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज आहे. याआधी चेतन शर्माने भारताकडून कसोटी सामन्यात दहा विकेट्स घेतल्या होत्या. १९८६ मध्ये एजबॅस्टनच्या मैदानामध्येच चेतन शर्माने ही कामगिरी केली होती. आता इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा विक्रम आकाश दीपच्या नावावर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poha Side Effects : रोज पोहे खाताय? मग सावधान! ब्लड शुगरसह 'या' ३ गंभीर समस्यांचा वाढतो धोका

Maharashtra News Live Update: ST महामंडळाच्या ऑडिटवरून भाजप शिंदेसेना संघर्ष पेटणार

Ladki Bahin Yojana : ₹१५०० की ₹३०००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात या महिन्यात किती पैसे येणार? पाहा अपडेट

Rava Khobryache Modak Recipe : ना उकड, ना जास्त मेहनत! फक्त २ पदार्थांत बनवा गणरायाचे आवडते रवा-खोबऱ्याचे मोदक

Vidyanand Bapat: श्रद्धेचा अवमान नको! विद्यानंद बापट यांना कायदेशीर नोटीस; ४८ तासांत बिनशर्त माफीची मागणी

SCROLL FOR NEXT