Ainkya Rahane Press Conference: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.
या मालिकेत रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर अजिंक्य रहाणेला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३५ वर्षीय अजिंक्य रहाणेला संघाबाहेर केलं गेलं होतं. मात्र त्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करत संघात कमबॅक केलं आहे.
दरम्यान पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अजिंक्यला असा काही प्रश्न विचारण्यात आला होता, ज्यावरून त्याने संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले आहे.
पत्रकार परिषदेत अजिंक्य रहाणेला त्याच्या वयावरून प्रश्न विचारण्यात आला होता.' या वयात म्हणजे काय? मी अजूनही तरुण आहे. मी आयपीएलमध्ये केली आहे. मी देशांतर्गत क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीत माझा आत्मविश्वास वाढला आहे. मी माझ्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. मी आता ज्या पद्धतीने खेळतोय, मला फक्त खेळण्याचा आनंद घ्यायचा आहे. मी पुढे काय होईल या गोष्टीचा विचार करत नाही.' (Latest sports updates)
तसेच तो पुढे म्हणाला की, 'सध्या माझ्यासाठी एकूण एक सामना महत्वाचा आहे. केवळ माझ्यासाठीच नव्हे तर संघासाठी देखील महत्वाचा आहे.' वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून चेतेश्वर पुजाराला वगळण्यात आलं आहे. त्याच्याऐवजी यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यशस्वी जयस्वालला संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, ' पुजाराच्या जागी जो कोणी खेळण्यासाठी मैदानात उतरेल त्याच्यासाठी ही मोठी संधी असणार आहे. मला नाही माहित तो खेळाडू कोण असेल. संघातील सर्व खेळाडू अनुभवी आहेत. मला पुर्ण विश्वास आहे की,जो कोणी खेळाडू या स्थानी खेळणार त्याच्यासाठी ही योग्य संधी असणार आहे.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.