ajinkya rahane twitter
Sports

Ajinkya Rahane: अज्जूला कॅप्टन बनवलं अन् टीम मॅनेजमेंटची डोकेदुखी वाढली; प्रश्न सुटता सुटेना

Ajinkya Rahane Captaincy: येत्या काही दिवसात आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाचं कर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

कोलकाता नाईट रायडर्सने गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. मात्र ही स्पर्धा झाल्यानंतर केकेआरने कर्णधार श्रेयस अय्यरला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आगामी हंगामासाठी या संघाला नव्या कर्णधाराची गरज होती.

केकेआरने अजिंक्य रहाणेला आपल्या संघात स्थान दिलं आणि संघाचं कर्णधारपदही दिलं. कर्णधारपद मिळाल्यानंतर रहाणेला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळणार हे निश्चित आहे, पण तो कितव्या क्रमांकावर खेळणार हे अजूनही कन्फर्म झालेलं नाही.

हे खेळाडू करु शकतात डावाची सुरुवात

माध्यमातील वृत्तानुसार, केकेआरचे सलामीवीर फलंदाज जवळवजळ निश्चित आहे. या संघाकडून सुनील नरेन आणि क्विंटन डी कॉक डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात. माजी भारतीय फलंदाज आकाश चोप्राच्या मते, ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर वेंकटेश अय्यर परफेक्ट आहे. मग रहाणे कितव्या क्रमांकावर खेळणार?

अजिंक्य रहाणे कितव्या क्रमांकावर खेळणार?

कर्णधारपदाची जबाबदारी सोपवल्यानंतर रहाणे प्लेइंग ११ खेळणार, ही काळ्या डगडावरची रेघ आहे. जर रहाणेला टॉप ऑर्डरमध्ये खेळवायचं असेल, तर केकेआरच्या टॉप ऑर्डरमध्ये बदल करावा लागेल. जर रहाणेला सलामीला फलंदाजीसाठी पाठवायचं असेल, तर सुनील नरेनला थांबवून डी कॉक आणि रहाणेला सलामीला पाठवण्याचा पर्याय उपलब्ध आहे. असं झाल्यास लेफ्टी - रायटी कॉम्बिनेशनचा मार्ग देखील मोकळा होऊ शकतो. तर दुसरा पर्याय असा की, वेंकटेश अय्यरऐवजी रहाणे तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

रहाणे चौथ्या क्रमांकावर खेळणार?

सलामीला फलंदाजीला येण्यासह रहाणे आणखी एका क्रमांकावर खेळू शकतो. रहाणेला कितव्या क्रमांकावर खेळवायचं? हे केकेआर मॅनेजमेंटसाठी डोकेदुखी असणार आहे. आता रहाणे कितव्या क्रमांकावर खेळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT