aishwarya jadhav, wimbledon 2022, kolhapur saam tv
Sports

Wimbledon 2022 : कुस्तीच्या पंढरीतील ऐश्वर्या जाधवची विम्बल्डन स्पर्धेसाठी निवड (व्हिडिओ पाहा)

कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील यांनी ऐश्वर्या जाधव हिच्या यशाबद्दल तिला पन्नास हजार रुपये बक्षीस दिले.

संभाजी थोरात

कोल्हापूर : कुस्तीची पंढरी म्हणून ठसा उमटविलेल्या काेल्हापूरातील (kolhapur) खेळाडू आता विदेश खेळात देखील आपली छाप उमटवित आहेत. येथील टेनिसपटू ऐश्वर्या जाधव (aishwarya jadhav) हिची आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंड (England) येथे होत असलेल्या विम्बल्डन (wimbledon 2022) स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झालेली ऐश्वर्या जाधव हि देशातील एकमेव टेनिसपटू ठरली आहे. ऐश्वर्या ही कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. ती छत्रपती शाहू विद्यालयात शिकते. ऐश्वर्याला प्रशिक्षक अर्षद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभत आहे. (aishwarya jadhav latest marathi news)

राजधानी नवी दिल्लीत झालेल्या जागतिक ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून आशियायी संघ निवडण्यात आला. यामध्ये १४ वर्षांखालील गटात दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आलीे. त्यामध्ये काेल्हापूराच्या ऐश्वर्या जाधव हिचा समावेश झाला आहे. या बराेबरच जपानची अझुना इचीओका, कझाकिस्तानची झांगर नुरलानुली आणि कोरियाची सी हॅयुक चो यांचा देखील संघात समावेश आहे.

ऐश्वर्या ur १३ वर्षाची आहे. ती ज्युनियर विम्बल्डन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धेत १४ वर्षांखालील वयोगटात सभागी हाेणार असल्याने तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव हाेत आहे. ऑल इंडिया टेनिस फेडरेशन (एआयटीए) नंबर वन ऐश्वर्या विम्बल्डननंतर बेल्जियम, पॅरिस आणि जर्मनी येथे होणाऱ्या युरोप ज्युनियर टेनिस स्पर्धांमध्येही सहभागी होणार आहे असेही सांगितलं जात आहे. सन 2021 च्या सुरुवातीला ती भारतात 14 वर्षांखालील मुलींच्या गटात 94 व्या क्रमांकावर होती, परंतु वर्षाच्या अखेरीस तिने सातव्या स्थानावर झेप घेतली.

ऐश्वर्याने वयाच्या पाचव्या वर्षी रॅकेट हाती घेतले आणि ती नऊ वर्षांची असल्यापासून स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. तिने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. ऐश्वर्या तिच्या यशाचे श्रेय तिच्या कुटुंबियांना देते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT