Ahmednagar: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचे विजेच्या धक्क्याने निधन!
Ahmednagar: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचे विजेच्या धक्क्याने निधन! सचिन आगरवाल
क्रीडा | IPL

Ahmednagar: प्रसिद्ध बॉडी बिल्डरचे विजेच्या धक्क्याने निधन!

सचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर: अहमदनगर Ahmednagar शहरातील मिस्टर एशिया Mr. Asia किताब मिळवणारा प्रसिद्ध शरीर षौष्ठव पटू अजिंक्य गायकवाड Ajinkya Gaikwad याचा बुधवारी राहत्या घरी विजेच्या धक्क्याने Electric Shock मृत्यू झाला आहे. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्याला विजेचा धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.

माजी नगरसेवक सुरेश गायकवाड यांचा मुलगा आणि सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांचे पुतणे अजिंक्य यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्वानी हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे देखील पहा-

अवघ्या वयाच्या 28व्या वर्षीय अजिंक्यचा राहत्या घरी विजेचा किरकोळ धक्का बसून मृत्यू कसा होऊ शकतो याबाबत सर्वाना शंका होती. अजिंक्य याच्या मृत्युमुळे सर्वांना धक्का बसला होता. त्याचा नेमका कशामुळे मृत्यू झाला, हे समजू शकले नव्हते. जागरूक नागरीक मंचाने पाहणी केल्यानंतर त्यांना वास्तव समोर आले. लोकल नेटवर्कच्या केबलमध्ये वीजप्रवाह उतरला होता. तोच अजिंक्यच्या मृत्यूला कारणीभूत ठरला, असा दावा सुहास मुळे यांनी केला आहे.

ही केबल वीजखांबावरून गेली असल्याने महावितरणही याला जबाबदार आहे. त्यानुसार उद्या गुन्हा केला जाणार असल्याचे अजिंक्यच्या नातेवाईकांनी सांगितले.

महानगर पालिका आणि महावितरणच्या भरारी पथकाच्या अक्षम्य दिरंगाई मुळे या तरुणाचा अंत झाला त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जागरूक नागरिक मंचच्या वतीने दाखल करणार असल्याचं सुहास मुळे यांनी सांगितले.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शहांच्या भाषणाचा बनावट व्हिडीओ व्हायरल; भाजप नेते आक्रमक, पोलिसांत गुन्हा दाखल

Horoscope Today: आजचे राशिभविष्य, 'या' राशींच्या लोकांसाठी सोमवार ठरणार त्रासदायक; तुमची रास यात नाही ना?

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

SCROLL FOR NEXT