Rinku Singh Approached Rohit Sharma for a Bat saam tv
Sports

Rinku Singh: विराटनंतर रोहित शर्माकडे बॅट मागायला पोहोचला रिंकू सिंह; पाहा हिटमॅनने काय केलं, Video व्हायरल

Rinku Singh asks for bat from Rohit sharma: कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग सामना संपल्यानंतर थेट मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये गेला. तिथे त्याने माजी कर्णधार रोहित शर्माची बॅट मागितली.

Surabhi Jayashree Jagdish

कोलकाता नाईट रायडर्सचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगला यंदाच्या आयपीएलमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. रिंकूची बॅट इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये अजून चाललेली नाही. सोमवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यातही मोठा स्कोर करता आला नाही. यावेळी तो १४ चेंडूत १७ रन्स करून बाद झाला. या सामन्यात केकेआरला दारूण पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र यानंतर रिंकु सिंह मात्र चांगलाच चर्चेत आहे.

सामना संपल्यानंतर, कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू रिंकू सिंग मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूमध्ये पोहोचला. यावेळी तो माजी कर्णधार रोहित शर्माच्या ड्रेसिंग रूममध्ये त्याची बॅट मागण्यासाठी गेला होता. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयपीएल दरम्यान रिंकूचे अनेक वेळा विराट कोहलीकडून बॅट मागतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेत.

पंड्याने रिंकू सिंहला झापलं

तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, रिंकू मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये एका कोपऱ्यात उभा राहून रोहितकडून बॅट मागताना दिसतोय. दरम्यान हे पाहून तिलक वर्मा गमतीने म्हणाला, "त्याच्या नावाची एक चांगली बॅट आली आहे. त्याच्याकडे इतकी छान बॅट आहे, तरीही तो भावाकडून (रोहितकडून) बॅट मागतोय." यावेळी रोहित त्याच्या किट बॅगमधून एक-एक करून बॅट काढून त्यांची तपासणी करत असतो. यावेळी हार्दिक पांड्या तिथे येतो आणि रिंकूला झापतो.

रिंकूने काय दिलं उत्तर

हार्दिक पंड्याने झापल्यानंतर रिंकू , मी फक्त रोहित शर्माला भेटायला आलोय असं सांगतो. या घटनेचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये सावधान रहे, सतर्क रहे, असं म्हटलंय.

कशी आहे रिंकूची कामगिरी?

रिंकू सिंगला या सिझनमध्ये आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये फक्त २४ बॉल खेळता आले आहेत. यामध्ये त्याने फक्त २९ रन्स केले आहेत. त्याच्या खराब फॉर्मचा परिणाम कोलकाता टीमवरही झाला आहे. परिणामी टीमने तीनपैकी दोन सामने गमावले. तर एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT