यंदाच्या सिझनची सुरुवात चेन्नई सुपर किंग्जच्या टीमसाठी काही फारशी चांगली झालेली नाही. यंदाच्या सिझनमध्ये चेन्नईच्या टीमला केवळ दोन सामन्यांमध्ये विजय मिळवणं शक्य झालं आहे. तर दुसरीकडे टीमचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाडला दुखापत झाल्याने तो संपूर्ण सिझनमधून बाहेर झाला. यानंतर आता धोनीला दुखापत झाल्याने चेन्नईचा कर्णधार पुढच्या सामन्यात खेळणार का हा प्रश्न सर्वांच्या समोर आहे.
ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीनंतर चेन्नईचं कर्णधारपद महेंद्र सिंग धोनीकडे देण्यात आलं आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या टीमने १ सामना जिंकला तर एक सामना गमावला आहे. दरम्यान लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धच्या सामन्यानंतर धोनीला देखील दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. सामन्यानंतरचा त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे.
लखनऊविरूद्ध धोनी चेन्नईसाठी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यावेळी त्याने ११ चेंडूंमध्ये नाबाद २६ रन्सची खेळी केली होती. धोनीने त्याच्या या खेळीमधये ४ फोर आणि १ सिक्स लगावली. या सामन्यातच त्याच्या पायामध्ये काही अडचण असल्याचं दिसून येत होतं. यानंतर सामन्यानंतर तो लंगडत चालताना दिसला.
मुख्य म्हणजे धोनीला या पायाला यापूर्वीही दुखापत झाली होती. त्यामुळे आता ऋतुराजनंतर धोनीही स्पर्धेतून बाहेर होणार का असा सवाल आता चाहत्यांच्या मनात आहे.
रविवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार आहे. दरम्यान या सामन्यात धोनी खेळणार की नाही हे त्याच्या फीटनेसवर अवलंबून अशणार आहे. शिवाय दुखापतीवर धोनीकडून अजून काहीह अधिकृतरित्या माहिती मिळालेली नाही. मात्र जर त्याच्या पायाची दुखापत गंभीर असेल तर तो अजून काही सामने बाहेर राहू शकतो.
हाताच्या कोपराच्या दुखापतीमुळे चेन्नई सुपर किंग्जचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड टूर्नामेंटमधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी सीएसकेमध्ये आयुष म्हात्रेला टीममध्ये जागा देण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.