rishabh pant yandex
Sports

Delhi Capitals: दिल्ली कॅपिटल्सला दुहेरी धक्का! रिकी पाँटींगनंतर रिषभ पंतही सोडणार संघाची साथ? मोठं कारण आलं समोर

Rishabh Pant Leave Delhi Capitals: काही दिवसांपूर्वीच रिकी पाँटिंगने दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडली आहे. दरम्यान आता रिषभ पंतही संघाची साथ सोडणार आहे.

Ankush Dhavre

दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाची साथ सोडू शकतो,असा अंदाज वर्तवला जात आहे. नुकतेच दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने मुख्य प्रशिक्षकपदावरून माघार घेतली. गेली ७ वर्ष तो या संघाच्या संपर्कात होता. दरम्यान रिकी पाँटिंगनंतर आता रिषभ पंतही दिल्ली कॅपिटल्सच्या फॅन्सला तगडा धक्का देऊ शकतो.

रिषभ पंत आणि रिकी पाँटिंग यांच्यातील मैत्री खूप चांगली झाली होती. आता रिकी पाँटिंगने संघाची सतू सोडल्यानंतर रिषभ पंतही मोठा निर्णय घेऊ शकतो. रिषभ पंत २०१६ पासून दिल्ली संघाचं प्रतिनिधित्व करतोय. २०२१ मध्ये त्याला या संघाचं कर्णधारपद देण्यात आलं होतं. मात्र आता संघ बदलाचे वारे वाहू लागले आहेत. आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे जर रिषभने संघाची साथ सोडली तर कुठलाही संघ त्याच्यावर मोठी बोली लावू शकतो. असं झाल्यास रिषभ पंत आगामी हंगामात दिल्लीऐवजी इतर संघाकडून खेळताना दिसून येऊ शकतो.

रिषभ पंतच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला केवळ एकदाच प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला आहे. आयपीएल २०२१ मध्ये झालेल्या एलिमिनेटरच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र त्यानंतर या संघाला उतरती कळा लागली. गेल्या ३ हंगामात या संघाला एकदाही प्लेऑफमध्ये प्रवेश करता आलेला नाही.

भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणाले होते की,' मला तुम्हाला एक बातमी सांगायची आहे. रिकी पाँटिंग यापुढे दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच नसेल. जॉफ्री बॉयकॉट बरोबर म्हणतात, रिकी पाँटिंगने गेल्या ७ वर्षात एकही मोठा निर्णय घेतलेला नाही. मला तरी हेच वाटतं की, दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच भारतीय असावा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

'दम मारो दम' राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता नशा करण्यात दंग, 'तो' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT