Hardik Pandya after fourth loss saam tv
Sports

Hardik Pandya : चौथ्या पराभवानंतर हार्दिक खचला; म्हणाला, मला कळत नाही काय बोलू...!

Hardik Pandya after fourth loss : आरसीबीच्या गोलंदाजीत कृणाल पंड्याने चार बळी घेतले, तर यश दयाल आणि जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन गडी बाद केले. सामना संपल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या निराश दिसला आणि त्याच्या चेहऱ्यावर पराभवाची छाया स्पष्टपणे दिसत होती.

Surabhi Jayashree Jagdish

आयपीलएलच्या २० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगळूरूने मुंबईचा १२ रन्सने धुव्वा उडवला. या सामन्यात तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या खेळी व्यर्थ गेली. पहिल्यांदा करताना पाच बाद २२१ रन्स केले होते. आरसीबीकडून विराट कोहली आणि रजत पाटीदार यांनी शानदार अर्धशतके झळकावली. मुंबईकडून कर्णधार हार्दिक पांड्याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

आरसीबीच्या मोठ्या स्कोरला प्रत्युत्तर देताना मुंबई इंडियन्सने ९ गडी गमावून केवळ २०९ रन्स करू शकली. मुंबईकडून तिळक वर्माने 29 चेंडूत 56 तर हार्दिक पांड्याने 15 चेंडूत 42 रन्सची खेळी केली. आरसीबीकडून कृणाल पांड्याने चार, यश दयाल, जोश हेजलवूडने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दरम्यान या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पंड्या निराश झाला होता.

पराभवानंतर इमोशनल झाला हार्दिक

मुंबईत घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवामुळे कर्णधार हार्दिक पांड्या खूप निराश आणि भावूक दिसला. पराभवाचं दुःख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. मुंबईला पराभूत केल्यानंतर आरसीबीचा ऑलराऊंडर कृणाल पांड्या त्याचा भाऊ हार्दिककडे आला आणि मिठी मारून त्याचं सांत्वन केलं.

काय म्हणाला हार्दिक पंड्या?

आरसीबीकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक म्हणाला की, ही विकेट फलंदाजीसाठी चांगली होती. पुन्हा एकदा दोन मोठे हिट्स आमच्यासाठी कमी पडले. मला कळत नाहीये दुसरं काय बोलावं. गोलंदाजांना गोलंदाजी करणं अवघड होतं. मी फक्त एवढेच म्हणू शकतो की, जर आम्ही १२ रन्स कमी दिले असते तर निकाल वेगळा असता. गेल्या सामन्यात रोहित उपलब्ध नव्हता म्हणून आम्ही नमनला फलंदाजीच्या क्रमवारीत वर पाठवलं. रोहितच्या कमबॅकने त्याला खाली फलंदाजीसाठी पाठवलं."

चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू

हार्दिक पुढे म्हणाले की, अशा सामन्यांमध्ये पॉवरप्ले खूप महत्वाचा असतो. काही ओव्हरमध्ये रन्स पाहिजे तसे आले नाहीत. डेथ ओव्हर्सवर बरेच काही अवलंबून असते. बुमराह असणं हे जगातील कोणत्याही टीमला खूप खास बनवतं. त्याने येऊन आपलं काम केलं, त्याला पाहून खूप आनंद झाला. आयुष्यात नेहमी सकारात्मक राहिले पाहिजे आणि पुढील सामन्यात खेळाडूंना हाच मेसेज आहे की सर्वोत्तम क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT