Cameroonian football stadium (file photo) Saam tv
क्रीडा

Cameroon Football Stadium: फूटबाॅलप्रेमींत चेंगराचेंगरी; ६ ठार ५० जखमी, लहान मुलं गंभीर जखमी

या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश आफ्रिकन फुटबॉल महासंघाने दिले आहेत.

साम न्यूज नेटवर्क

कॅमेरून : आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल (africa cup of nations football tournament) स्पर्धेदरम्यान स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन सहा जण ठार तर सुमारे ५० पेक्षा अधिक फुटबाॅलप्रेमी जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. कॅमेरूनच्या राजधानीतील ओलेम्बो स्टेडियममध्ये सोमवारी ही घटना घडली. (africa cup of nations six dead many more injured in cameroon football stadium stampede)

कॅमेरून आणि कोमोरोस यांच्यात अंतिम (१६) फेरीचा सामना होता. हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये फुटबॉलप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, प्रवेशद्वारावर चेंगराचेंगरी झाल्याने काहींना आपला जीव गमवावा लागला आहे. या दुर्घटनेच्या चाैकशीचे आदेश आफ्रिकन फुटबॉल महासंघाने (africa cup of nations) दिले आहेत.

गर्दीत चिरडल्याने मुले जखमी

ओलेम्बे स्टेडियमची एकूण ६० हजार प्रेक्षक क्षमता आहे. कोरोनामुळे (corona) केवळ ८० टक्के लोकांनाच प्रवेश देण्यात आला हाेता. परंतु हा (football) सामना पाहण्यासाठी ५० हजारांहून अधिक लोक आल्याचे सांगितलं जात आहे. दरम्यान, चेंगराचेंगरी (stampede) झाली. यामुळे अनेक जण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रवेशदाराकडे धावले. त्यात अनेक मुले (childrens) चिरडली गेली.

जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक

कॅमेरूनच्या मध्य विभागातील गव्हर्नर नासेरी पॉल बिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुर्घटनेत जखमी झालेल्यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. आम्ही या प्रकरणाचा तपास करत असून ही घटना कशी घडली याची संपूर्ण माहिती गोळा करत आहोत.

हा सामना कॅमेरूनने जिंकला

या घटनेनंतरही सामना स्टेडियममध्ये सुरूच होता. कॅमेरूनने कोमोरोसचा पराभव करून सामना 2-1 ने जिंकला. या घटनेपूर्वीही आफ्रिका कप ऑफ नेशन्स फुटबॉल स्पर्धा चर्चेत होती. १४ जानेवारीला घाना आणि गॅबॉन यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात भिडले. या सामन्यात एका खेळाडूला लाल कार्डही दाखवण्यात आले होते.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूकीच्या मतमोजणीला थोड्याच वेळात सुरुवात

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT