भारतीय संघाचा वर्ल्डकप स्पर्धेतील दुसरा सामना अफगाणिस्तान संघाविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ दोन हात करताना दिसून येणार आहेत.
या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीला भारतीय फिरकी गोलंदाजांचा सामना कसा कराल? असा प्रश्न विचारला गेला होता.
या प्रश्नावर हशमतुल्लाह शाहिदीने रोखठोक उत्तर दिल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच विराट आणि नवीन उल हक वादावर देखील त्याने भाष्य केलं आहे.
आयपीएल २०२३ स्पर्धेदरम्यान विराट कोहली आणि नवीन उल हक या दोघांमध्ये वाद पेटल्याचे पाहायला मिळाले होते. आता हे दोन्ही खेळाडू आमने सामने येणार आहेत. याबाबत प्रश्न विचारला असता अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणाला की,' भारत आमच्यासाठी घरासारखं आहे.
इथे आम्ही खूप क्रिकेट खेळलो आहे. भारतीय फॅन्स अफगाणिस्तान क्रिकेट संघाला भर भरून प्रेम देतात. मैदानावर कुठल्याही खेळाडूचा पारा चढू शकतो. हे वाद भारत आणि अफगाणिस्तानसोबत जोडला जाऊ शकत नाही.
हे कोणासोबतही होऊ शकतं. तुम्ही पाहिलंच असेल की, आमचे काही खेळाडू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडला आदर्श मानतात.' (Latest sports updates)
फिरकी गोलंदाजांचा सामना कसा कराल याबाबत बोलताना, अफगाणिस्तानचा कर्णधार म्हणाला की,'आम्ही नेट्समध्ये उत्तम दर्जाच्या फिरकी गोलंदाजांसोबत सराव करतो. राशिद,मोहम्मद नबी, नूर अहमद आणि मुजीब या गोलंदाजांचा दररोज सामना करतो. त्यामुळे आम्ही फिरकी गोलंदाजांचा सामना करण्यासाठी आमचा संघ मजबूत आहे, असं मला वाटतं.'
या सामन्यासाठी अशी असू शकते अफगाणिस्तान संघाची प्लेइंग ११:
रहमानुल्लाह गुरबाज़ (यष्टीरक्षक), इब्राहिम जादरान, रहमत शाह, हश्मतुल्लाह शाहीदी (कर्णधार), मोहम्मद नबी, नजीबुल्ला जादरान,अजमतुल्ला ओमरजई, राशिद खान, नवीन उल-हक, मुजीब उर रहमान आणि फजलहक़ फारुकी.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.