World Cup 2023 saam Tv
Sports

World Cup 2023: भारताचा ऑलराउंडरच अफगाणिस्तानला सांगणार टीम इंडियाला पराभूत करण्याचं सीक्रेट

Ajay Jadeja: विश्वचषक २०२३ सुरू होण्यापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतीय संघाचा माजी खेळाडू अजय जडेजाला आपल्या संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलंय.

Bharat Jadhav

Ajay Jadeja As Mentor of Afghanistan Team:

यंदाचा वर्ल्ड कप २०२३ भारतात होत असून क्रिकेटच्या महायुद्धाचा खेळ ५ ऑक्टोबरपासून पाहायला मिळणार आहे. यंदाचा वर्ल्डकप विस्मरणीय होण्यासाठी बीसीसीआयनं जोरदार तयारी केलीय. तर या स्पर्धेत भाग घेणारे इतर देशातील क्रिकेट संघांनी जोरदार तयारी केलीय. २०२३ चा विश्वकप आपल्या देशात यावा यासाठी सर्व संघ कसून तयारी करत आहेत.

अफगाणिस्तान देशाचा संघही या स्पर्धेत जोर लावताना दिसत आहे. यासाठी या संघाला भारताचा माजी ऑलराउंडर क्रिकेटपटू मदत करणार आहे. या क्रिकेटपटूमुळे अफगाणिस्तानला टीम इंडियाला कसं पराभूत करावं याचं सीक्रेट मिळवणार आहे.(Latest Sport News)

हा क्रिकेटपटू कोण असं प्रश्न तुम्हाला पडला असेल. हा क्रिकेटपटू आहे, अजय जडेजा. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं भारतीय संघाचा माजी अनुभवी खेळाडू अजय जडेजाला आपल्या संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केलंय. जडेजानं भारतासाठी १३ एकदिवशीय सामन्यांचे नेतृत्व केलं आहे. तर त्याने एकूण १९६ सामने खेळले आहेत. जडेजानं आपल्या कारकीर्दीत तीन वर्ल्डकपसाठी भारताकडून खेळलाय.

अजय जडेजानं ६ शतकं आणि ३० अर्धशतकांसह ३७.४७ च्या सरासरीनं ५ हजार ३५९ धावा केल्या आहेत. अजय जडेजा या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा आठवा खेळाडू आहे. जडेजानं १९९२ ते २००० या काळात भारतासाठी १५ कसोटी सामने खेळले आहेत. यात २६.१८ च्या सरासरीने ५७६ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने ४ अर्धशतके केली आहेत. यात त्याने ९६ धावांची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या केलीय.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अजय जडेजाच्या संस्मरणीय खेळी १९९६मधील क्रिकेट विश्वचषकाची आहे. या विश्वचषकाचा उपांत्यपूर्व सामना बंगळुरू येथे झाला होता. या सामन्यात त्याने पाकिस्तानविरुद्ध २५ चेंडूत ४५ धावा केल्या होत्या. याच सामन्यात भारतीय फलंदाजांनी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार युनूसच्या शेवटच्या दोन षटकात ४० धावा केल्या होत्या.

मॅच फिक्सिंगचा आरोप

जडेजाने १९८८ मध्ये हरियाणाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि २९१ लिस्ट एचे सामने खेळले. मॅच फिक्सिंग केल्याप्रकरणी अजय जडेजावर ५ वर्ष खेळण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या करिअरला ब्रेक लागल्यानंतर अजयनं चित्रपटात आपलं नशीब अजमावलं. दरम्यान जडेजानं दिल्ली उच्च न्यायालयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची परवानगी मागणारी याचिका दाखल केली होती.

मात्र न्यायालयानं ती याचिका फेटाळली होती. दरम्यान जडेजा देशांतर्गत क्रिकेट खेळू शकत होता. तो राजस्थान संघाचा कर्णधार-सह-प्रशिक्षक बनला होता. त्यानंतर जडेजाने क्रिकेट समालोचन देखील केले आहे. २०१५ -१६ च्या हंगामात दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्याने काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

SCROLL FOR NEXT