afghanistan cricket team  twitter
Sports

AFG vs SA, Semi Final: अफगाणिस्तानच्या नावे लज्जास्पद रेकॉर्डची नोंद! सेमिफायनलमध्ये पहिल्यांदाच घडलं असं काही

Afghanistan Record In AFG vs SA Semi Final: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात अफगाणिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील पहिल्या सेमिफायनलचा सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने दणक्यात फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

संपूर्ण स्पर्धेत ऑल राऊंड कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानला या सामन्यात हवी तशी कामगिरी करता आली नाही. अफगाणिस्तानचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. संघाचा डाव अवघ्या ५६ धावांवर आटोपला. यासह अफगाणिस्तानच्या नावे नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

या सामन्यात अफगाणिस्तानच्या फलंदाजांकडून फ्लॉप शो पाहायला मिळाला. पावरप्लेमध्येच संघातील ५ फलंदाज माघारी परतले होते. यापूर्वी या स्पर्धेत केवळ पापुआ न्यू गिनी आणि युगांडा सारख्या संघातील फलंदाज स्वस्तात माघारी परतले होते. आता अफगाणिस्तानच्या नावे या लज्जास्पद रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या सामन्यातील ६ षटकात अवघ्या २८ धावांवर अफगाणिस्तानचे ५ फलंदाज माघारी परतले होते. यासह टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सेमिफायनलच्या सामन्यात पावरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स गमावण्याचा रेकोर्ड हा अफगाणिस्तानच्या नावे नोंदवला गेला आहे.

हे ५ फलंदाज झाले बाद..

अफगाणिस्तानकडून फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाज (०), गुलबदीन नायब (९), इब्राहीम जदरान (२) मोहम्मद नबी ( ०) आणि खरोटे शून्यावर माघारी परतला.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय फसला. कारण पहिल्या डावात अफगाणिस्तानला अवघ्या ५६ धावा करता आल्या.

अफगाणिस्तानकडून ओमरजाईने सर्वाधिक १० धावा केल्या. तर गोलंदाजी करताना शम्सीने ३,मार्को यांसेनने ३ आणि नोर्खियाने २ गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेकडून धावांचा पाठलाग करताना रिजा हेंड्रिक्सने नाबाद २९ धावांची खेळी करून संघाला ९ गडी राखून विजय मिळवून दिला. यासह दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये दाखल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईत मतदारयादीत अद्भुत किमया, एकाच घरात ६ आडनावं असलेल्या व्यक्ती; मनसेने सत्य आणलं समोर

Trikadasha Yog: 3 नोव्हेंबरपासून चमकणार 'या' राशींचं नशीब; गुरू आणि शुक्र बनवणार त्रिएकादश योग

Maharashtra Live News Update: पुण्यातील एचएनडी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?

Is waking up at 3 am normal: दररोज पहाटे ३-५ या वेळेत जाग येतेय? सावध व्हा आणि पाहा शरीर तुम्हाला काय संकेत देतंय?

Success Story: वडिलांच्या निधनानंतर आयुष्य बदललं! ना कॉलेज, ना कोचिंगशिवाय क्रॅक केल्या १२ सरकारी परीक्षा; IPS संदीप चौधरी यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT