अनेक क्षेत्रात आपला डंका वाजवल्यानंतर आता अदानी ग्रुपने (Adani group) क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री घेतली आहे. अमीरात क्रिकेट बोर्डाने (Emirates Cricket Board) पुष्टी केली की अदानी समूहाने लवकरच सुरू होणार्या UAE ट्वेंटी-20 लीगमध्ये फ्रँचायझी खरेदी केली आहे. आतापर्यंत, ECB ने मँचेस्टर युनायटेडच्या ग्लेझर कुटुंबासह पाच फ्रँचायझींच्या ऑन-बोर्डिंगची घोषणा केली आहे. "अदानी समूहाचा एक भाग असलेल्या अदानी स्पोर्ट्सलाइनने UAE च्या T-20 प्रीमियर लीगमध्ये फ्रँचायझी विकत घेत क्रिकेटमध्ये ऐतिहासिक पाऊल टाकले आहे," असे ECB ने 9 मे रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
अदानी ग्रुपच्या आगमनानंतर आता सर्व सहा फ्रँचायझी पुढील जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लीग सुरू करण्यासाठी तयार आहेत. अदानी आणि ग्लेझर्स याच्या व्यतिरिक्त, दुबईस्थित कॅप्री ग्लोबल, दिल्ली कॅपिटल्सची मालकी असलेली GMR आणि IPL मधील मुंबई इंडियन्स संघाची मालकी असलेली रिलायन्स इंडस्ट्रीजने देखील लीगमध्ये संघ विकत घेतला आहे, असे ECB ने देखील जाहीर केले आहे. ECB ने अद्याप शाहरुख खानची लीगमधील भागीदारी जाहीर केलेली नाही, ती लवकरच होईल अशी अपेक्षा आहे. एमिरेट्स बोर्डाने यापूर्वीच झी समूहासोबत मीडिया हक्क करार केला आहे.
ईसीबीने सांगितले, “अमिराती क्रिकेट बोर्डाची UAE T20 लीग ही परवानाकृत वार्षिक स्पर्धा आहे, ज्यामध्ये सहा संघ असतात तर 34 सामने होत असतात. क्रिकेट खेळणाऱ्या सर्व देशांतील अव्वल खेळाडू या लिगमध्ये खेळाताना दिसतील. ही लीग आगामी युवा क्रिकेटपटूंना नवं व्यासपीठ उभे करुन देईल. अदानी स्पोर्ट्सलाइनचे हे पहिले परदेशातील मोठे काम आहे. जे जगभरातील क्रिकेट चाहत्यांशी जोडले जाणार आहे.
UAE T20 लीगचे अध्यक्ष खालिद अल जरूनी म्हणाले, “संघाचे मालक म्हणून, अदानी समूहासाठी UAE च्या T20 लीगशी जोडले जाणे हा अभिमानाचा क्षण आहे. लीगमधील संघाचे हक्क ज्यांनी आधीच संपादन केले आहे अशा कॉर्पोरेट्सच्या गटामध्ये हे पूर्णपणे बसते. अदानी ग्रुप लीगशी जोडला जाणे चांगले आहे. आम्ही त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचा फायदा घेण्यासाठी आणि आमची लीग यशस्वी करण्यासाठी एकत्र काम करण्यास उत्सुक आहोत.”
Edited By: Pravin Dhamale
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.