Achinta Sheuli, Common Wealth Games 2022, weightlifting , PM Narendra Modi Saam TV
क्रीडा

Achinta Sheuli : भारतास तिसरे सुवर्णपदक मिळताच पंतप्रधान माेदी म्हणाले, आता आशा आहे की..., (व्हिडिओ पाहा)

मीराबाई चानू, बिंदियारानी देवी, संकेत सरगर, गुरुराजा पुजारी, जेरेमी लालरिनुंगा यांच्यानंतर अंचिता शिउलीनं केली काॅमनवेल्थ गेम्समध्ये उत्तम कामगिरी.

Siddharth Latkar

बर्मिंगहॅम : बर्मिंगहॅम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये (common wealth games 2022) टीम इंडियानं तिसरे सुवर्णपदक (gold medal) जिंकले. वेटलिफ्टर अचिंता शिउली (Achinta Sheuli) याच्या वेटलिफ्टिंगमधील सुवर्ण कामगिरीमुळं भारताचा (India) या स्पर्धेत (india at common wealth games 2022) दबदबा राहिला आहे. अचिंता शिउलीचे देशभरातून काैतुक हाेऊ लागले आहे. (Achinta Sheuli Latest Maeathi News)

मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा यांच्या सुवर्ण कामगिरीनंतर अचिंता शिउलीने देशवासियांच्या मनात घर केले. त्यानं पहिल्या लिफ्टमध्ये 137 किलो वजन उचलले. दुसऱ्या लिफ्टमध्ये 140 किलो तर तिसऱ्या लिफ्टमध्ये 143 किलो वजन उचलले.

अचिंता शेउलीला क्लीन अँड जर्कच्या पहिल्याच प्रयत्नात 166 किलो वजन उचललं. त्यानंतर 170 किलो वजन उचलण्याचा त्याने प्रयत्न केला, मात्र त्यात त्याला यश आलं नाही. तिसऱ्या प्रयत्नात त्याने पुन्हा 170 किलो वजन उचलत स्वतःचा विक्रम स्थापित केला.

अचिंता शेउली याने सुवर्ण पदक मिळविल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र माेदी (PM Narendra Modi) यांनी या स्पर्धेपुर्वी भारतीय संघास शुभेच्छा देताना अचिंता याच्याशी साधलेल्या संवादाची चित्रफित आज ट्विट केली आहे. या ट्विटमध्ये पंतप्रधान माेदींनी आता अचिंता याने पदक मिळविलं आहे. आता त्याला चित्रपट पाहण्यासाठी वेळ मिळेल असे म्हटलं आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: OMG! कूलरमध्ये ८ फूट साप दबा धरुन बसला, घरातल्यांना पळती भुई थोडी, व्हिडीओ व्हायरल

Khopoli Accident : भल्या पहाटे पुणे-मुंबई महामार्गावर अपघात, खासगी बस ट्रकला धडकली, ८ जणांची प्रकृती चिंताजनक

Chhagan Bhujbal: 'ईडीपासून मुक्तीसाठी भाजपसोबत गेलो', पुस्तक बॉम्बमुळे महायुतीची कोंडी

Maharashtra Politics: सत्तेची दोरी ओबीसींच्या हाती; मुस्लीम मतदार ठरणार निर्णायक

Winter Health: हिवाळ्यात फिट अँण्ड फाइन राहायचंय? तर आजपासून करा 'ही' कामे

SCROLL FOR NEXT