viral catch video twitter
क्रीडा

Viral Catch Video: लागली का पैज? असा झेल तुम्ही कधीच पाहिला नसेल ! Video पाहूनही बसणार नाही विश्वास

Bengal Pro T20 League 2024: बंगाल प्रो टी-२० क्रिकेट लीग स्पर्धेत अभिषेक दासने अविश्ववसनिय झेल टिपला आहे.

Ankush Dhavre

कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर बंगाल प्रो टी-२० २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेतील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. दरम्यान बंगालचा क्रिकेटपटू अभिषेक दासने मिदनापूर विजार्ड्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भन्नाट झेल टिपला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

अभिषेक दास हा उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आहे. यापूर्वी ही त्याने अनेक भन्नाट झेल टिपले आहेत. मात्र यावेळी टिपलेला झेल जरा हटकेच होता. या सामन्यात तो सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी फलंदाजाने त्यावेळी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाने मिड ऑनच्या वरुन षटकार मारण्याचा प्रयत्न केला.

चेंडू सीमारेषेपार जाणारच होता इतक्यात अभिषेक दासने उंच उडी मारली आणि डाईव्ह मारत हा अविश्वसनिय झेल टिपला. हा झेल पाहून फलंदाजासह गोलंदाज आणि संघातील इतर क्षेत्ररक्षकही आश्चर्यचकीत झाले. मुख्य बाब म्हणजे त्याने झेल टिपल्यानंतर त्याने शिखर धवन स्टाईल मांडी ठोकून हटके सेलिब्रेशन केलं. हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं,तर स्पर्धेतील ७ व्या सामन्यात मिदनापूर विजार्ड्स आणि हावरा वॉरियर्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मिदनापूर विजार्ड्स या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मिदनापूर विजार्ड्सने २० षटकअखेर १३२ धावा केल्या.

या संघाकडून सलामीला आलेल्या विवेक सिंगने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली. तर कौशिक मैटीने ३२ धावा केल्या. या सामन्यात हावरा वॉरियर्स संघाला विजयासाठी १३३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना प्रमोद चंडीलाने ४६ आणि पंकज शॉने ३६ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Heavy Rain : बीड जिल्ह्यात परतीचा जोरदार पाऊस; कांदा पिक पाण्यात तरंगले

Shalimar Kurla express Derailed : शालिमार-कुर्ला एक्प्रेसचे डबे रुळावरून घसरले; रेल्वे सेवा विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

SCROLL FOR NEXT