abhimanyu twitter
क्रीडा

Irani Cup 2024: दुहेरी शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही टीम इंडियात संधी मिळेना

Abhimanyu Easwaran Century In Irani Cup 2024: रेस्ट ऑफ इंडिया संघाकडून खेळत असलेल्या अभिमन्यू ईश्वरनने धावांचा पाऊस पाडला आहे.

Ankush Dhavre

Abhimanyu Easwaran News In Marathi: इराणी कप २०२४ स्पर्धेतील सामना मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यातील पहिल्या डावात मुंबईने सरफराज खानच्या दुहेरी शतकी खेळीच्या बळावर धावांचा डोंगर उभारला.

त्यानंतर फलंदाजीला आलेल्या रेस्ट ऑफ इंडिया संघानेही मुंबईच्या गोलंदाजांनी चांगलाच समाचार घेतला. या संघाकडून फलंदाजी करताना, अभिमन्यू ईश्वरनने १९१ धावांची शानदार खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने संघाची धावसंख्या ४०० पार पोहोचवली. त्याला दुहेरी शतक झळकावण्याची संधी होती. मात्र त्याची ही झुंझार खेळी १९१ धावांवर संपुष्टात आली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस

अभिमन्यू ईश्वरन हा देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळालीये, तेव्हा तेव्हा धावा करत त्याने स्वत:ला सिद्ध केलंय. इराणी ट्रॉफीतही त्याच्या शानदार फलंदाजीचा नमुना पाहायला मिळाला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या कारकिर्दीतील २६ वे शतक झळकावले. या डावात त्याला दुहेरी शतक झळकावण्याची संधी होती. मात्र हे दुहेरी शतक अवघ्या ९ धावांनी हुकलं.

भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या प्रतिक्षेत

देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडूनही त्याला भारतीय संघात संधी मिळत नाहीये. काही महिन्यांपूर्वी सरफराज खान बाबतही अशीच चर्चा सुरु होती. सरफराजनेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. अखेर त्याला इंग्लंडविरुद्ध पदार्पणाची संधी मिळाली. मात्र अभिमन्यू ईश्वरनने लक्षवेधी कामगिरी करुनही त्याला भारतीय संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळत नाहीये.

भारतीय संघ बॉर्डर गावसकर मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेपूर्वी अभिमन्यू ईश्वरनने निवडकर्त्यांचं लक्ष वेधून घेण्याचं काम केलं आहे. आता त्याला संधी मिळणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: परीक्षा फी भरली म्हणून आयोगाची मनसे उमेदवाराला नोटीस

Winter Drinks: हिवाळ्यात हे आरोग्यदायी पेय प्या आणि शरीराला ठेवा उबदार

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport : सोलापूरकरांसाठी मोठी गुडन्यूज! 'या' तारखेपासून सुरू होणार विमानसेवा, मुंबई-गोव्याला काही तासात पोहचणार!

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

SCROLL FOR NEXT