Sports

Team India: टीम इंडियाच्या माजी खेळाडूला पोलिसांकडून अटक; दारूच्या नशेत अनेक गाड्यांना ठोकल्याची माहिती

former Team India player arrested: माजी टीम इंडिया खेळाडूला पोलिसांनी अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तो मद्यपान करून वाहन चालवत होता आणि या दरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली.

Surabhi Jayashree Jagdish

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. माजी खेळाडू जेकब जोसेफ मार्टिन याला दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आणि अपघात केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक करण्याक आली आहे. ही घटना २६ जानेवारी २०२६ रोजी रात्री उशिरा घडल्ययाची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्टिन पहाटे २:३० च्या सुमारास अकोटा परिसरातून पुनीतनगर सोसायटीतील मार्टिन त्याच्या घरी एमजी हेक्टर कार चालवत होता. त्याने इतक्या प्रमाणात दारू प्यायली होती की, चालवत असलेल्या गाडीवरचं त्याचं नियंत्रण सुटलं. यावेळी गाडी पार्क केलेल्या तीन गाड्यांना धडकली.

या अपघाताचा मोठा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावले. त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास सुरू केला. सुरुवातीच्या तपासात अपघाताचं कारण माजी भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू जेकब जोसेफ मार्टिन असल्याचं उघड झालंय. त्यानंतर पोलिसांनी त्याला दारू पिऊन गाडी चालवल्याच्या आरोपाखाली अटक केलीये.

पोलिसांनी केलेल्या नोंदीनुसार, जेकब मार्टिन हा वडोदराच्या गोत्री परिसरातील शालिन फ्लॅटमध्ये राहतो. त्याचं नाव यापूर्वी दुसऱ्या एका प्रकरणातही समोर आल्याची माहिती आहे. काही काळापूर्वी गोत्री मदर्स स्कूलजवळील शालिन फ्लॅटच्या टेरेसवर दारू पित असताना पोलिसांनी जेकब मार्टिनसह सहा जणांना अटक केली होती.

पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान जेकब मार्टिनने सांगितलं की, त्याने त्याच्या मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याच्या मित्रांसाठी पार्टी आयोजित केली होती. इतकंच नाही तर कबुतरांवर गोळीबार करण्याच्या पूर्वीच्या प्रकरणात देखील सामील होता.

पोलिसांकडून तपास सुरु

या ताज्या घटनेमुळे शहरात चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी संबंधित गाड्यांची तपासणी केली आहे. यावेळी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. दारू पिऊन गाडी चालवणं आणि सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणं या आरोपांची चौकशी केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत,अजित पवारांचं विमान अपघातात निधन

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानाला अपघात, ६ जणांचा मृत्यू; DGCA ची माहिती

Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या विमानाचा अपघात, दुर्घटनेचा पहिला व्हिडिओ अन् फोटो समोर

Water Shortage : पुण्यात पाणीबाणी! 'या' भागांत २४ तास पाणी पुरवठा राहणार बंद; जाणून घ्या कारण

Ajit Pawar: मोठी बातमी! अजित पवारांच्या विमानाला अपघात, लँडिंगदरम्यान बारामतीत दुर्घटना, VIDEO समोर

SCROLL FOR NEXT