Tennis tournament in Ghana Viral Video Twitter/@Kwesi_Gibson
क्रीडा

मॅच हरला, राग अनावर झालेल्या खेळाडूने प्रतिस्पर्ध्याच्या कानशीलात लगावली (पाहा Video)

Tennis tournament in Ghana Viral Video: एका टेनिस प्रशिक्षकाने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला, त्यानंतर तो व्हायरल झाला. ट्विटरवर 7.38 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Tennis tournament in Ghana: घाना या देशातील टेनिस स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. खेळाडूने सामना संपल्यानंतर प्रतिस्पर्धी खेळाडूला कानशीलात लगावल्याने मोठा वाद झाला. सोमवारी आयटीएफ ज्युनियर स्पर्धेदरम्यान ही घटना घडली. मायकेल कौमे आणि राफेल नि आंक्रा हे या दोन खेळाडूंमध्ये हा सामना रंगला होता. (15 year old tennis player slaps opponent after losing match watch viral video)

हे देखील पहा -

घानाकडून सामना हरल्यानंतर 15 वर्षीय मायकेल कौमे या खेळाडूने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडू राफेल नि आंक्रा याला सेंटर कोर्टवरच सर्वासमोर कानशीलात लगावली. तो हस्तांदोलनासाठी पुढे आला आणि त्याने थेट आंक्राच्या कानशीलात लगावली. ही घटना तिथे उपस्थित प्रेक्षकांनी आपल्या कॅमेरॅत कैद केली आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर बराच वाद झाला. हे फुटेज सुरुवातीला फंक्शनल टेनिस पॉडकास्टने शेअर केले होते, ज्यांनी मंगळवारी एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये सांगितले की व्हिडिओ काढला जाईल. मात्र, एका टेनिस प्रशिक्षकाने हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला, त्यानंतर तो व्हायरल झाला. ट्विटरवर 7.38 लाखांहून अधिक वेळा हा व्हिडिओ बघितला गेला आहे.

फ्रेंच टेनिसपटू कौमे सुरवातीला स्पर्धेच्या शीर्षस्थानी होता, परंतु त्याने त्याच्या प्रतिस्पर्ध्याकडून सुरुवातीचा सेट गमावला. त्याने दुसरा सेट जिंकून सामना टायब्रेकवर नेला. टायब्रेकसाठीही चुरशीची लढत झाली पण, शेवटी आंक्रा विजयी झाला. फायनल स्कोर 6-2, 6-7, 7-6 असा होता. कौमने आंक्रावर हल्ला का केला हे स्पष्ट झालेले नाही. आंक्राने आता दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे जिथे त्याचा सामना घानाच्या इस्माएल ने नॉर्टे डोवुओनाशी होणार आहे. इटलीच्या डेव्हिड ब्रुनेटी आणि फ्रान्सच्या मिशेल कौक यांच्याविरुद्धच्या दुहेरी सामन्यातही तो दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

SCROLL FOR NEXT