om walke saam tv
Sports

Om Walke Swimmer: कोल्हापूरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा! १४ वर्षीय ओमने सॅन फ्रान्सिस्को खाडी केली पोहून पार

Om Walke: ओम वाळकेने सॅन फ्रान्सिस्को येथील खाडी पोहून पार करत इतिहास रचला आहे.

Ankush Dhavre

रंजीत माजगावकर

Kolhapur Latest News: कोल्हापूरच्या १४ वर्षीय ओम वाळकेने महाराष्ट्राचे नाव अभिमानाने उंचावले आहे. कोल्हापूर म्हटलं तर सर्वात आधी कुस्ती आणि त्यानंतर फुटबॉल आठवतं मात्र १४ वर्षीय ओम वाळकेने सॅन फ्रान्सिस्कोमध्ये जाऊन संपूर्ण जगाला कोल्हापूरची एक वेगळी ओळख दाखवून दिली आहे.

ओम वाळकेने सॅन फ्रान्सिस्को येथील खाडी पोहून पार करत इतिहास रचला आहे.

१४ वर्षीय ओम वाळकेने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या शालेय विद्यार्थ्याने अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील खाडी पोहून पार केली आहे. अल्ट्राट्राझ ते सॅन फ्रान्सिस्को या ठिकाणी हा जलतरण उपक्रम पार पडला. गोल्डन गेट ब्रिज या जगप्रसिद्ध वास्तू शिल्पाच्या खालून पोहत जाण्याचा हा एक वेगळा अनुभव यावेळी ओम व त्याच्या सहकाऱ्यांनी घेतला. ओमचे आई वडील हे नोकरी करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. सध्या ते आपल्या कुटुंबासह अमेरिकेतच राहतात. (Latest sports updates)

ओम अमेरिकेत शिक्षण घेत असून तेथील नेपचून स्विमिंग फाउंडेशनच्या मार्फत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस वेगवेगळ्या ठिकाणावरून ही खाडी पार करण्यात आली. ही खाडी पोहून पार करणं कुठल्याही जलतरणपटूसाठी मोठं आव्हान आहे. कारण सकाळच्या वेळी ७ ते ८ डिग्रीच्या थंडीमध्ये पोहायला सुरवात केली जाते. (Om Walke)

पहिल्या दिवशी २.५ किमी व दुसऱ्या दिवशी १.९३ किमी इतके अंतर न थांबता पोहत पार करावे लागते. ओम वाळके याचे छत्रपती शिवाजी महाराज व सरसेनापती हंबीराव मोहिते हे प्रेरणास्थान आहेत.

ओमचे वडील सचिन वाळके व आई अनघा वाळके यांचे त्याला विशेष प्रोत्साहन मिळाले असून नेपचून जलतरण संस्थेच्या माध्यमातून या उपक्रमात सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: ४,००० किमीचा प्रवास! देशातील सर्वात लांब महामार्ग कोणता?

EPFO New Scheme : EPFO ची नवी योजना, १ लाखांपर्यंत पगारदारांना १५ हजारांचा फायदा! ३० एप्रिलपर्यंत नोंदणीची संधी |VIDEO

Maharashtra Live News Update: माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला

Shraddha Kapoor: बॉलिवूडच्या 'स्त्री'ची हॉलिवूडमध्ये एन्ट्री; डिस्नेच्या 'या' चित्रपटात करणार श्रद्धा कपूर

Accident News : स्कूल बसचा भीषण अपघात, झाडाला धडक दिल्यानंतर...; २२ विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT