Vastu Shastra Gift Google
आध्यात्मिक

Vastu Shastra: 'या' ३ भेटवस्तू मानल्या जातात अतिशय शुभ; घरात राहील सकारात्मक ऊर्जा

Vastu Shastra Gift: वास्तुशास्त्रानुसार काही भेटवस्तू अशा आहेत ज्या घरात ठेवणे खूप शुभ असतं, असं म्हटलं जातं. या भेटवस्तू घरात ठेवल्याने घरातील सर्व समस्या दूर होतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजच्या धावपळीच्या जगात प्रत्येकाला यश मिळवायचे असते. यासाठी आपण खूप मेहनत घेत असतो. पण अनेकांच्या जीवनात संकटं आणि अडचणी खूप असते. या समस्यांपासून मुक्ती हवी असेल वास्तुशास्त्राचा काही उपाय करुन पहा. सर्व समस्यांचे निराकरण वास्तुशास्त्रात सांगितले आहेत. तुम्ही जर आर्थिक अडचणीशी झुंज देत असाल तर काही भेटवस्तू आहेत ज्या तुम्ही तुमच्या घरात ठेवल्यानं तुमची आर्थिक तंगी दूर होईल.

वास्तू यंत्र

वास्तूशास्त्रानुसार वास्तु यंत्र एक भौमितिक आकृती आहे. जर तुम्हाला वास्तु यंत्र कोणत्याही प्रकारे भेट म्हणून मिळाले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ आहे. कारण वास्तुदोष दूर करण्यात वास्तु यंत्र प्रभावी ठरते. वास्तु यंत्रामुळे घरात सुख, समृद्धी आणि समृद्धी येते. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घराच्या उत्तर किंवा पूर्व भिंतीवर वास्तु यंत्र टांगल्यास मन एकाग्र राहत असते.

श्री गणेशाची मूर्ती

वास्तूशास्त्रानुसार, जर तुम्ही तुमच्या घराच्या प्रवेश द्वारावर भगवान गणेशाची मूर्ती लावत असाल तर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा राहत असते. त्याचबरोबर तुमच्या सर्व समस्या मिटत असतात. वैवाहिक जीवनातील समस्या सुद्धा दूर होत असतात. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर गणेशमूर्तीची स्थापना केली पाहिजे.

कमळाचं फूल

वास्तूशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर तुम्ही क्रिस्टल कमळाचं फूल घरी आणा. कमळाच्या फुलाने घरात सकारात्मकता राहील. कमळाचे फूल आणल्याने आध्यात्मिक वाढ वाढविण्यात आणि सकारात्मक वातावरण राखण्यात मदत होते. तसेच घरात शांतता टिकून राहते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नांदेड हादरलं! कुटुंबातील चौघांचा मृत्यू; २ तरुण्याबांड पोरांची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, घरी आई-बापानं जीवन संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Bangladesh: बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, बेदम मारहाण करून जीव घेतला

Pune Corporation Election: जागा वाटपावरून महायुतीचं बिनसलं, शिवसेना युतीमधून बाहेर पडणार? शिंदे गटाचा अल्टिमेटम

शिंदेंच्या यशानं, पवारांना टेन्शन! सेना - राष्ट्रवादीत ईर्ष्येची लढाई, अस्वस्थ दादा का भडकले मंत्र्यांवर?

मशालीला कॉग्रेसचा हात? ठाकरेसेनेला कॉंग्रेसचा पाठिंबा

SCROLL FOR NEXT