Surya Gochar saam Tv
आध्यात्मिक

Surya Gochar: चंद्राच्या घरात सूर्याचं संक्रमण; ६ राशींच्या लोकांचे भाग्य सोन्यासारखे चमकेल

Surya Gochar : सूर्याच्या राशीतील या बदलामुळे ६ राशींच्या लोकांचे नशीब सोन्यासारखे चमकू शकते. सूर्याचं हे संक्रमण १६ जुलै रोजी होणार आहे.

Bharat Jadhav

ग्रहांचा राजा सूर्याचं राशी परिवर्तन जुलैच्या मध्यात होणार आहे. सूर्य चंद्राच्या कर्क राशीत १६ जुलै रोजी सकाळी ११: २९ वाजता प्रवेश करणार आहे. जुलै १६ ते १६ ऑगस्ट या कालावधीत सूर्य देव कर्क राशीत राहणार आहेत. सूर्याच्या राशीतील या बदलामुळे ६ राशीच्या लोकांचे नशीब सोन्यासारखे चमकेल.

वृषभ

कर्क राशीतील सूर्याचे संक्रमण वृषभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकतं. जे लोक परदेशात नोकरी किंवा स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत आहेत, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. हा काळ अनुकूल राहील. प्रयत्नांमध्ये कमी पडू नका. या काळात तुमचे शौर्य वाढेल आणि तुमच्या कामाचे कौतुक होईल. पद आणि प्रतिष्ठा देखील वाढू शकते.

कन्या

सूर्यदेवाच्या कृपेमुळे कन्या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. या राशीतील जातकांना अचानक आर्थिक लाभ आणि उत्पन्न वाढल्यामुळे बँक खात्यात शिल्लक वाढेल. अनेकांची त्यांच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तुमच्या निर्णयांची प्रशंसा केली जाईल. या काळात तुम्ही काही नवीन काम सुरू करू शकता. तुम्हाला काही मोठे काम मिळू शकते.

तूळ

सूर्याच्या राशीत बदलामुळे तूळ राशीच्या लोकांचे भाग्य उजळेल. 16 जुलै ते 16 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला काही मोठे यश मिळू शकते. या काळात काही जातकांच्या योजना यशस्वी होतील. त्याचा त्यांना सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. राजकारणात तुमच्या नशिबाचे तारे चमकू शकतात. तुम्हाला मोठे पद मिळू शकते. काहींच्या पाठीवर कौतुकाची थाप पडेल.

वृश्चिक

सूर्य गोचरामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं. तुमचे नशीब बलवान होईल आणि तुमचं शौर्य वाढेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु यासाठी तुम्हाला एक पथ्य पाळावे लागेल. व्यवसाय संदर्भात जो तुम्ही प्लान करत आहात तो कोणाला सांगू नका. गोपनीयतेने काम केल्यास यश मिळेल. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.

कुंभ

सूर्य ग्रहाने राशी बदल करणं हे कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदान ठरेल. या राशीच्या जातकांनी वेळेचा सदुपयोग करावा. या काळात जे काही काम हाती घ्याल ते पूर्ण होईल. काही महत्त्वाच्या क्षणी घेतलेल्या निर्णयाची दाद मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही काळ चांगला असेल.

मीन

सूर्याचे भ्रमण मीन राशीच्या लोकांसाठी प्रगतीचे दरवाजे उघडवणारे ठरेल. या राशीतील अनेकांचं प्रमोशन होईल त्यांचे पद आणि प्रतिष्ठा वाढेल. अचानक आर्थिक लाभ होईल. ज्या लोकांचा पैसा कोणाकडे अडकला असेल तर तो पैसा या काळात मिळेल. नोकरदार आणि व्यावसायिक लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: छगन भुजबळ २४ तारखेला भरणार उमेदवारी अर्ज

Brics Summit: हरे कृष्णा, हरे रामा! कोर्स्टन हॉटेलमध्ये गुंजला टाळचा आवाज; भजनाने पीएम मोदींचं स्वागत|Video Viral

Share Market Crash : शेअर बाजाराला भगदाड; सेन्सेक्समध्ये मोठी घसरण, कोणते १० शेअर धाडधाड कोसळले?

Nana Patole : 'मला बाजूला केलं नाही, आमच्यात भांडण लावू नका'; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

Nalasopara News : धक्कादायक..खासगी शिकवणीतील शिक्षिकेची मुलीला बेदम मारहाण; दहा वर्षीय मुलीची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT