आध्यात्मिक

साईमंदिरातील लाखोंची चिल्लर देवस्थानसाठी डोकेदुखी  

गोविंद साळुंखे

शिर्डीतलं साईमंदिर म्हणजे देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान. दरवर्षी असंख्य भाविक साईंच्या चरणी लीन होतात आणि कोट्यवधीचं दान देतात. मात्र हेच दान देवस्थानसाठी डोकेदुखी ठरू लागलंय. त्याचं झालं असं, साईमंदिरात दानपात्रात लाखोंची चिल्लर जमा झाली. देवस्थानने ही चिल्लर बँकेत जमा करण्याचा प्रयत्न केला मात्र जागा नसल्यानं बँकांनी चिल्लर स्विकारण्यास नकार दिलाय. 

साईबाबा मंदिरात जमा होणारी रक्कम थोडी थोडकी नाही. ही जवळपास सात लाख रूपयांची चिल्लर आहे आणि ती मोजायची म्हंटली तर आठ-दहा कर्मचारी लागतील. शिवाय त्यांचा अख्खा दिवस जाईल. 

दर आठवड्याला दोन वेळा संस्थांन मार्फत बँकेच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवार आणि शुक्रवारी मंदिराच्या दानपात्रातून पैशांची मोजणी केली जाते. दरवेळी साधारणपणे दोन कोटी रुपयांच्या नोटा आणि पाच लाख रुपयांची नाणी मोजली जातात. मंदिरातली नाणी आणि रोख रक्कम देशातील आठ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये आलटूनपालटून जमा केली जाते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून बँकांनी ही नाणी स्वीकारण्यास नकार दिलाय. त्यामुळे आता या चिल्लरचं करायचं काय? हाच प्रश्न साईबाबा देवस्थान समितीला पडलाय. 

WebTitle : marathi news shirdi saibaba devastha trust banks refused to take coins from trust

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT