Mangal Nakshatra Parivartan 2024 
आध्यात्मिक

Mangal Nakshatra: मंगळ ग्रहाचं नक्षत्र बदलणं पडणार महागात; ५ राशींसाठी धोक्याची घंटा, काय होतील परिणाम जाणून घ्या

Mangal Nakshatra Parivartan 2024: ग्रहांचा सेनापती म्हणजेच मंगळ हा धैर्य, ऊर्जा आणि सामर्थ्य देणारा ग्रह मानला जातो. कुंडलीत जेव्हा जेव्हा हा ग्रह कमजोर असतो तेव्हा त्याच व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडत असतो.

Bharat Jadhav

वैदिक कॅलेंडरनुसार आजपासून 6 दिवसांनी मंगळ आपला मार्ग बदलणार आहे. मंगळ ग्रह 8 जुलै 2024 रोजी पहाटे 02:11 वाजता कृत्तिका नक्षत्रात प्रवेश करेल. या संक्रमणाचे शुभ आणि अशुभ दोन्ही प्रभाव सर्व 12 राशींच्या जीवनावर दिसून येतील. काही राशीच्या लोकांना त्यांच्या सर्व समस्यांपासून सुटका होईल. तर राशींच्या लोकांवर दु:खाचा डोंगरही कोसळू शकतो. त्यांना आर्थिक नुकसान तसेच दुखापतदेखील होऊ शकते. चला तर जाणून घेऊ अशा कोणत्या ५ राशी आहेत ज्यांच्या जीवनावर वाईट परिणाम होणार आहे ते जाणून घेऊ.

मिथुन

या राशींच्या जातकांसाठी मंगळ ग्रहाचं संक्रमण डोकेदुखी ठरणार आहे. या राशीमधील जे जातक नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. चुकूनही त्यांनी यावेळी नोकरी सोडू नये. नाहीतर त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागेल. तसेच जे लोक व्यावसाय करत आहेत, त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. त्यांचे मोठे नुकसान होऊ शकते.

वृषभ

या संक्रमणाचा वृषभ राशीदेखील फटका बसणार आहे. जर या राशीतील जातक भागीदारीत व्यावसाय किंवा इतर कोणताही करार करत असाल तर ते चुकूनही फायनल करू नका. जर करार केला असेल तर त्या करारमुळे भविष्यात मोठं नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद होऊ शकतात. विवाहितांनी बोलण्यात सौम्यता ठेवावी, अन्यथा भांडण होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यक्रमादरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडण होऊ शकतात.

सिंह

नोकरदारांनी आपल्या आरोग्याबाबत गाफील राहू नये, अन्यथा मोठा आजार होऊ शकतो. विवाहित जोडप्याला एखाद्या गोष्टीबद्दल काळजी वाटू शकते. व्यवसायिकांचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. व्यवसायात नुकसान झाल्यामुळे व्यावसायिकांना मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

कर्क

मंगळ ग्रहाच्या परिवर्तनामुळे कर्क राशीच्या लोकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. जे लोक काही दिवसांपूर्वी नवीन नोकरीवर रुजू झाले आहेत, त्यांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. उद्योगपतीच्या कामात विरोधक अडथळे निर्माण करू शकतात. विद्यार्थ्यांचे वरिष्ठांशी भांडण होऊ शकते. यावेळी जमीन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची तुमची योजना सोडून द्या. भविष्यात तुम्हाला न्यायालयात जावे लागू शकते.

तूळ

या राशीतील नोकरदार लोक वैयक्तिक बाबींबद्दल चिंतेत राहू शकतात, ज्यामुळे ऑफिस कामावरही परिणाम होईल. आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. अन्यथा पोटाशी संबंधित गंभीर समस्या उद्भवू शकतात. खर्च वेळेत कमी केला नाही तर आर्थिक परिस्थिती कमकुवत होऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव पोलिसांची कारवाई! 1 लाख 40 हजार रुपयांचा गांजा जप्त, तीन महिला अटकेत

कोल्हापूर स्पेशल! CSMT ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास होणार अतिजलद; जाणून घ्या किती असेल रेल्वे तिकीट, अन् थांबे

Olya Naralachi Vadi Recipe: गूळ घालून बनवा ओल्या नारळाच्या वड्या, फक्त 10 मिनिटांत होईल रेसिपी

Manoj Jarange Patil:मराठा आणि ओबीसी दंगल घडवण्याचा खटाटोप सुरू; मनोज जरांगे यांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

Rahul Gandhi : जनता काँग्रेसच्या प्रश्नांची उत्तरे मागतंय, म्हणून निवडणूक आयोगानं...; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT