Akshaya Tritiya 2024 
आध्यात्मिक

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Akshaya Tritiya 2024: हिंदू दिनदर्शिकेनुसार, अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जातेय. अक्षय्य तृतीयेचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हिंदू पंचागानुसार अक्षय्य तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेचा सण हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी दान, पूजा, जप आणि तपश्चर्या करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे खूप शुभ मानले जातं. यंदा अक्षय्य तृतीया हा सण १० मे रोजी साजरा होणार आहे. आज आम्ही तुम्हाला अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणकोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सांगणार आहोत.

तामसिक भोजन करू नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही मसालेदार पदार्थ खाऊ नयेत. यासोबतच मांस आणि मद्य सेवन निषिद्ध मानले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केवळ सात्विक अन्नच खावे, यामुळे मानसिक शांती मिळत असते.

घाण पसरवू नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते तिथे लक्ष्मी माता राहत असते. यासाठी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि घरात कचरा करू नका.

तुळशीची पाने तोडू नका

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करणे शुभ मानले जातं. यामुळे अक्षय्य तृतीयेला तुळशीची पाने तोडू नयेत. या दिवशी तुळशीची पूजा करून संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा.

हे चुकीचे काम करू नका

अक्षय्य तृतीयेला जुगार, चोरी, दरोडा, जुगार, खोटे बोलणे यासारखे कोणतेही चुकीचे काम करू नका. हे गोष्टी केल्यास तर लक्ष्मी माता रागावते.

कर्ज घेऊ नका

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणालाही उधार देऊ नये. यामुळे घरात गरिबी येऊ शकते. यामुळे लक्ष्मी मातादेखील नाराज होऊ शकते.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: करवीर निवासिनी श्री. अंबाबाई देवीचे दर्शन उद्या दिवसभर बंद

कुणबी प्रमाणपत्र देताना पडताळणी करून देणार- चंद्रशेखर बावनकुळे|VIDEO

बीडकरांसाठी खुशखबर! साईबाबा मंदिर अन् शनी शिंगणापूरला काही तासांत पोहोचता येणार; नवी रेल्वेमार्गिका लवकरच सेवेत

Chiffon Saree: या सणासुदीला ट्राय करा बजेट फ्रेंडली शिफॉन साडी; मिळेल क्लासी आणि ग्लॅमरस लूक

कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरण; भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाडांना दिलासा, कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT