जालना - एकीकडे राज्यात डिझेलच्या Diesel दरात मोठी प्रमाणात वाढ होत असताना,दुसरीकडे जालन्यातील Jalna चंदनझिरा पोलिसांनी Police 36 हजार लिटर बायोडिझेल Biodiesel साठा एका पेट्रोल Petrol पंपावरून जप्त केले आहे. शहरापासून जवळ असलेल्या नागेवाडी परीसरातील पेट्रोल पंपावर महसूल आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या पेट्रोल पंपावरून बायोडिझेलची चोरून विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
हे देखील पहा -
या माहितीवरून पोलिसांनी आणि महसूल विभागाच्या पथकाने पेट्रोल पंपावर जाऊन झाडाझडती घेतली असता पेट्रोल पंपावर उभा असलेल्या टँकर मध्ये बायोडिझेल आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी बायोडिझेल भरलेल्या टँकरसह 78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय नागेवाडी परिसरातील ज्या पेट्रोलपंपावरून बायोडिझेल चोरट्या पद्धतीने विक्री केल जात होते. तो पेट्रोल पंप महसूल आणि पोलीस विभागाने सील केला आहे. पेट्रोल पंप मालकावर चंदनझिरा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.